कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठी घट, तरीही शेअरमध्ये 8% वाढ ! KPIT Tech च्या शेअर्समध्ये उसळीचे कारण नेमके काय?

ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी अभियांत्रिकी संशोधन आणि विकास सेवा कंपनी केपीआयटी टेकने चालू व्यवसाय वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निकाल जाहीर झाल्यानंतर या शेअरमध्ये रॉकेट तेजी सुद्धा दिसली आहे.

Published on -

KPIT Share Price : भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्या आता आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना दिसत आहेत. यात KPIT Tech कंपनीने देखील आपला तिमाही निकाल सार्वजनिक केला आहे. ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी अभियांत्रिकी संशोधन आणि विकास सेवा कंपनी केपीआयटी टेकने चालू व्यवसाय वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निकाल जाहीर झाल्यानंतर या शेअरमध्ये रॉकेट तेजी सुद्धा दिसली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच या स्टॉकमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीने आगामी वर्षासाठी मार्जिन आउटलूक सुद्धा वाढविला आहे, ज्यामुळे स्टॉकमध्ये ही तेजी आली असल्याचे बोलले जात आहे.

तसेच, कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स साठी मोठी घोषणा केली असून शेअर होल्डर्सला डिव्हिडेंट अर्थातच लाभांश जाहीर केला गेला आहे. हेच कारण आहे की या स्टॉक मध्ये तेजी आली आहे असे जाणकारांनी यावेळी स्पष्ट केले.

काय सांगतात तिमाहीचे निकाल

31 डिसेंबरपर्यंत, कंपनीकडे निव्वळ रोख शिल्लक 14,280 कोटी रुपये इतकी राहिली आहे. तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, कंपनीचे उत्पन्न डिसेंबरच्या तिमाहीत एकत्रित आधारावर 1478 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे.

मागील तिमाही मध्ये हे एकत्रित आधारावरील उत्पन्न 1471 कोटी रुपये होते. पण त्यांचवेळी कंपनीच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे. या कंपनीचा नफा 204 कोटी रुपयांवरून 187 कोटी रुपयांवर आला आहे.

कार्यरत नफा म्हणजेच EBITDA देखील तिमाही आधारावर 246 कोटी वरून 254 कोटी रुपयांवर आला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे EBITDA मार्जिन 16.7% वरून 17.2% पर्यंत वाढले आहे. कंपनीने वार्षिक मार्जिनचा दृष्टीकोन देखील वाढविला आहे, ते 20.5% वरून 21% पर्यंत वाढले आहे.

कंपनी डिव्हीडेंट सुद्धा देणार

कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स साठी 2.5 रुपये प्रति शेअर (25%) अंतरिम डीव्हीडेंट म्हणजेच लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख 4 फेब्रुवारी 2025 (मंगळवार) निश्चित करण्यात आली आहे.

शेअरची स्थिती कशी आहे?

कंपनीने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर याचे स्टॉक थोडे सुधारले आहेत. निकालानुसार कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये मोठी घट पाहायला मिळाली पण तरीही या स्टॉक मध्ये निकालानंतर सुधारणा झाली आहे. बुधवारी, 29 जानेवारी 2025 रोजी हा स्टॉक इंट्राडेमध्ये प्रति शेअर 1366 रुपयाच्या शिखरावर पोहोचण्यास यशस्वी ठरला.

केपीआयटी टेकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1928.70 रुपये आहे आणि 52-आठवड्यांचा नीचांक 1233.25 रुपये आहे. तथापि, गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये सुमारे 25% घसरण झाली आहे. त्याच वेळी, या स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 4% घसरण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News