महिन्याला 20 हजार कमवणाऱ्याला 10-15 लाखाचा होमलोन मिळणार ! किती रुपयांचा EMI भरावा लागणार ? वाचा….

महिन्याला वीस हजार रुपये कमावणाऱ्या लोकांना देखील बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र यासाठी सदर व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे तसेच त्याकडे उत्पन्नाचे पुरावे असायला हवेत. बँकांच्या माध्यमातून कमी पगार असणाऱ्या लोकांना कमी प्रमाणात कर्ज दिले जाते.

Published on -

Home Loan EMI Details : नोकरी लागली की सर्वप्रथम पगारदार मंडळी घरासाठी प्रयत्न करते. आपले स्वतःचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न. मात्र हे स्वप्न पूर्ण करणे काही सोपी बाब नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता फक्त बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करणे जवळपास अशक्य बनले आहे. विशेषतः पगारदार लोकांना तरी बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करता येणे सध्याच्या महागाईच्या काळात शक्य होत नसल्याची बाब दिसते.

यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की महिन्याला ज्या व्यक्तीचा पगार फक्त वीस हजार रुपये आहे त्याला किती लाखांचे गृह कर्ज मिळू शकते? नाही ना मग आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

20 हजाराचा पगार असेल तर गृह कर्ज मिळणार का?

महिन्याला वीस हजार रुपये कमावणाऱ्या लोकांना देखील बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र यासाठी सदर व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे तसेच त्याकडे उत्पन्नाचे पुरावे असायला हवेत. बँकांच्या माध्यमातून कमी पगार असणाऱ्या लोकांना कमी प्रमाणात कर्ज दिले जाते.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या बजेटनुसार घराची निवड करावी लागणार आहे. 20,000 पगार असणाऱ्या लोकांना जर वीस वर्ष कालावधीसाठी होम लोन घ्यायच असेल तर अशा व्यक्तीला फक्त 10 ते 15 लाखांचे होम लोन मिळू शकते.

बँका पगारदार व्यक्तीचा 50 ते 60 टक्के पगार ईएमआय म्हणून बाजूला काढण्यास सांगतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला दहा ते पंधरा लाखाचे कर्ज मंजूर झाले तर त्याला दहा ते बारा हजार रुपयांचा ईएमआय देखील भरावा लागणार आहे.

यामुळे वीस हजार रुपये पगार असणाऱ्या लोकांना कर्ज देण्यापूर्वी त्यावर आधीपासूनच एखादे कर्ज चालू आहे का याचीही तपासणी बँकांच्या माध्यमातून होत असते. तसेच अशा व्यक्तींचा सिबिल स्कोर देखील काळजीपूर्वक चेक केला जातो.

कमी सिबिल स्कोर असल्यास बँकांच्या माध्यमातून गृह कर्ज नाकारले जाऊ शकते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. साडेसातशे पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर तो चांगला समजला जातो. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना सहजतेने कर्ज मंजूर होते.

आता आपण 10 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यानंतर कितीचा हप्ता भरावा लागू शकतो आणि 15 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यानंतर कितीचा हप्ता भरावा लागू शकतो याचे गणित समजून घेणार आहोत.

दहा लाखाचे गृह कर्ज मंजूर झाल्यास कितीचा हप्ता ?

दहा लाख रुपयांचे गृह कर्ज, वीस वर्ष कालावधीसाठी जर 8% व्याजदराने मंजूर झाले तर अशावेळी 8364 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या काळात सदर व्यक्तीला वीस लाख 7456 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. यामध्ये दहा लाख रुपये मुद्दल असेल अन उर्वरित दहा लाख 7 हजार 456 रुपये व्याज राहणार आहे. यात प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस समाविष्ट नाहीयेत.

15 लाखाचे कर्ज मंजूर झाल्यास कितीचा हप्ता?

जर एखाद्या ग्राहकाला 15 लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्ष कालावधीसाठी 8.5% व्याजदराने मंजूर झाले तर अशावेळी सदर ग्राहकाला 13 हजार 17 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. या ग्राहकाला 16 लाख 24 हजार 164 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. अर्थातच मुद्दल आणि व्याज असे 31 लाख 24 हजार 164 रुपये भरावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News