Jio फायनान्शिअल शेअरमध्ये मोठी उसळी, कारण काय ? स्टॉक BUY करावा का ? पहा…

भारतीय शेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसली आणि यामुळे गुंतवणूकदारांचे चेहरे थोडेसे खुललेले पाहायला मिळाले. या तेजीच्या काळात शेअर मार्केट मधील अनेक स्टॉक तेजीत आलेत. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणारा जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनीचा स्टॉक देखील आज फोकस मध्ये आला.

Published on -

JIO Financial Services Share Price : आज भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्यांदा तेजी दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, आज 30 जानेवारी 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई सेन्सेक्स 313.83 अंकांनी वधारून 76846.79 वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई निफ्टी 116.10 अंकांनी वधारून 23279.20 वर खुला झाला.

भारतीय शेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसली आणि यामुळे गुंतवणूकदारांचे चेहरे थोडेसे खुललेले पाहायला मिळाले. या तेजीच्या काळात शेअर मार्केट मधील अनेक स्टॉक तेजीत आलेत. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणारा जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनीचा स्टॉक देखील आज फोकस मध्ये आला.

यामध्ये आज तेजी दिसली आणि ब्रोकरेज या स्टॉक साठी बुलिश झाले आहेत. देवेन चोक्सी ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटींग जाहीर केली आहे. अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला या ब्रोकरेजने दिला आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती नेमकी कशी आहे? मागील पाच वर्षांमध्ये या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्टॉक साठी आता काय टार्गेट प्राईज देण्यात आली आहे? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअरची सध्याची शेअर बाजारातील स्थिती

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअरची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 238.30 रुपये होती. आज दिवसभरात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर -1.02 टक्क्यांनी घसरून 235.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

पण जेव्हा हा स्टॉक ओपन झाला त्यावेळी याची किंमत 240.65 एवढी होती. म्हणजेच हा स्टॉक वाढीसह खुला झाला आणि -1.02 % घसरणीसह सध्या ट्रेड करतोय. आज दुपारी 3.50 वाजता हा स्टॉक दिवसभरातील उच्चांक 242.25 रुपये होता, तर आजचा याचा निच्चांकी स्तर 233.50 रुपये राहिला आहे.

याचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 394.70 रुपये आणि 52 आठवड्यांचा निच्चांक 231.05 रुपये इतका राहिलाय. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,49,143 Cr रुपये इतके आहे आणि या कंपनीवर कर्ज सुद्धा नाहीये. हेच कारण आहे की ब्रोकरेज यावर बुलिश आहेत. यामुळे ब्रोकरेज कडून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय.

गेल्या 5 वर्षात किती परतावा दिलाय ?

बीएसईवरून मिळालेल्या माहितीनुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर मागील 5 दिवसात -7.45 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात -22.97 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -28.37 टक्क्यांनी अन मागील 1 वर्षात -4.76 टक्क्यांनी घसरला आहे.

तसेच YTD आधारावर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर -22.52 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर 9.98 टक्क्यांनी वाढलाय.

शेअरसाठी काय टार्गेट प्राईज देण्यात आली आहे?

देवेन चोक्सी ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटींग जाहीर केली आहे. देवेन चोक्सी ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 286 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजेच या सध्याच्या पातळीपेक्षा हा स्टॉक आगामी काळात 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता या ब्रोकरेज फर्मकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News