HM Electro Mech IPO:- एचएम इलेक्ट्रो मेकच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग अर्थात आयपीओची लिस्टिंग अपेक्षेपेक्षा मंदावलेली राहिली. कंपनीचा शेअर बाजारात ८ टक्के प्रीमियमसह केवळ ८१ रुपयेवर सूचीबद्ध झाला.जो गुंतवणूकदारांच्या अपेक्षांपेक्षा कमी होता. ग्रे मार्केटमधील परिस्थिती पाहता याची लक्षणे आधीच दिसत होती की आयपीओची लिस्टिंग फारशी प्रभावी होणार नाही.
शेअरच्या किमतीत घसरण
लिस्टिंगनंतर लगेचच शेअरच्या किमतीत घसरण झाली आणि सकाळी १०:०५ वाजता हा शेअर ७७ वर पोहोचला. ही किंमत IPO च्या किंमत पट्ट्यापेक्षा फक्त २ रुपयांनी जास्त होती, जो ७१-७५ रुपये प्रति शेअर एवढा निश्चित करण्यात आला होता.
IPO चे तपशील आणि गुंतवणुकीची परिस्थिती
या आयपीओची प्राईस बँड ७१-७५ प्रति शेअर होती आणि लॉट साइज १६०० शेअर्स (किमान गुंतवणूक १,२०,०००) करणे गरजेचे होते.या IPO तून २७.७४ कोटी कंपनीचे उभारण्याचे लक्ष आहे व याकरिता कंपनीने ३६.९९ लाख नवीन शेअर्स जारी केले.हा IPO ओपनिंग २४ जानेवारी ते २८ जानेवारी या तारखांच्या दरम्यान झाला.
सुपरहिट सबस्क्रिप्शन, पण अपेक्षेपेक्षा कमी लिस्टिंग
या IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ९१ वेळा ओव्हर-सबस्क्राइब झालेल्या या IPO मध्ये विविध श्रेणींमध्ये पुढीलप्रमाणे सबस्क्रिप्शन झाले –
किरकोळ गुंतवणूकदार: ९५.५५ वेळा
NII (नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार): १८३ वेळा
QIB (संस्थात्मक गुंतवणूकदार): १६ वेळा
गुंतवणूकदारांचे काय?
एचएम इलेक्ट्रो मेक IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असला तरी लिस्टिंग अपेक्षेइतकी प्रभावी ठरली नाही. किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर या IPO मध्ये सहभाग घेतला असला तरी लिस्टिंगनंतर शेअरच्या किमतीत झालेली घसरण काही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरू शकते.