Squid Game Season 3 | ‘या’ तारखेला रिलीज होणार स्क्विड गेम 3, कुठं पाहणार सीरीज ?

स्क्विड गेमचे पहिले दोन सीजन ज्यांनी पाहिलेत ते सारे प्रेक्षक उत्सुकतेने स्क्विड गेम 3 ची प्रतीक्षा करीत आहेत. प्रेक्षकांच्या माध्यमातून ही सिरीज नेमकी कधी रिलीज होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान या मालिकेच्या तिसर्‍या सीझनची रिलीज तारीख आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Published on -

Squid Game Season 3 : OTT प्लॅटफॉर्मवर दररोज कोणती ना कोणती वेब सिरीज लॉन्च होते. OTT प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना विविध प्रकारचे कंटेंट उपलब्ध होत आहेत. ओटीटीवर सर्व प्रकारच्या भाषांमधील वेब सिरीज, मूवी अन मालिका तसेच चित्रपट प्रदर्शित होत असतात. दरम्यान ज्या लोकांनी स्क्विड गेम ही वेब सिरीज पाहिली आहे अशा लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

खरेतर, स्क्विड गेमचे पहिले दोन सीजन ज्यांनी पाहिलेत ते सारे प्रेक्षक उत्सुकतेने स्क्विड गेम 3 ची प्रतीक्षा करीत आहेत. प्रेक्षकांच्या माध्यमातून ही सिरीज नेमकी कधी रिलीज होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान या मालिकेच्या तिसर्‍या सीझनची रिलीज तारीख आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या सिरीजचा तिसरा सीजन कधी रिलीज होणार याची तारीख आता समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण ही सिरीज नेमकी कधी रिलीज होणार आणि ही सिरीज कुठे पाहता येईल याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

कधी रिलीज होणार Squid Game Season 3?

मंडळी, स्क्विड गेमच्या दुसर्‍या सीझनच्या सात भागांमध्ये बर्‍याच प्रमाणात चढ-उतार दिसले आहेत. या हंगामाबद्दल, दिग्दर्शक ह्वांगचा असा विश्वास होता की ही कहाणी सीझन 2 नंतर तिसर्‍या हंगामापर्यंत वाढवली जाऊ शकते. मालिकेच्या शेवटी एक वेगळा भाग असावा असे त्याला वाटले.

अशा परिस्थितीत त्याने तिसरा हंगाम बनवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता या मालिकेचा तिसरा भाग यावर्षी जून महिन्यात रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वेब सिरीजचा तिसरा सीजन 27 जून 2025 रोजी रिलीज होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

कुठे पाहता येणार वेब सिरीज ?

या सिरीजचा तिसरा पार्ट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम खात्यावर या मालिकेच्या तिसर्‍या हंगामाच्या रिलीझच्या तारखेची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

शोचा तिसरा हंगाम 27 जून 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. महत्वाचे म्हणजे निर्मात्यांनी शोच्या तिसर्‍या भागाशी संबंधित काही चित्रे देखील सामायिक केली आहेत. मंडळी स्क्विड गेमने जगभरात 900 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

असा अंदाज आहे की पहिल्या 23 दिवसांत 132 दशलक्ष लोकांनी कमीतकमी दोन मिनिटांसाठी हा कार्यक्रम पाहिला, ज्याने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या हिट शो ‘ब्रिजुनर्टन’ ने तयार केलेला मागील विक्रम मोडलाय. दरम्यान आता या वेब सिरीजचा पुढील पार्ट कोणता रेकॉर्ड तयार करतो हे पाहणे विषय उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News