वयाच्या 40 व्या वर्षी होम लोन घेणार असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा ! लाखोंच कर्ज पण ओझं वाटणार नाही

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जर जास्त असेल तर बँका कर्ज देताना विचार करतात. कारण की गृह कर्ज परतफेड करण्याचा कालावधी अधिक असतो. ज्यांचे वय अधिक असते त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि ईएमआयचे ओझे वाढते.

Tejas B Shelar
Published:

Home Loan News : गृह कर्ज घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. खरेतर, अलीकडे विविध बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात गृह कर्ज दिले जात आहे. पण बँका गृह कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय सुद्धा तपासतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जर जास्त असेल तर बँका कर्ज देताना विचार करतात. कारण की गृह कर्ज परतफेड करण्याचा कालावधी अधिक असतो.

ज्यांचे वय अधिक असते त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि ईएमआयचे ओझे वाढते. पण, घर खरेदी करणे सामान्य बाब नाही. घरासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. म्हणून असे बरेच लोक आहेत जे 40 किंवा त्याहून अधिक वय असताना घर विकत घेण्यास सक्षम होतात.

पण, जर आपणसुद्धा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असाल आणि या वयात तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. एका बड्या बँकेने स्वतःच या टिप्स ग्राहकांना दिल्या आहेत. आज आम्ही ज्या टिप्स सांगणार आहोत त्या टिप्स जर ग्राहकांनी फॉलो केल्या तर त्यांनी चाळीसाव्या वर्षी कर्ज घेतले तरी त्यांना कर्जाचे ओझे वाटणार नाही.

जॉईंट होम लोन : जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी घरासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही जॉईंट होम लोन चा पर्याय स्वीकारायला हवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत गृह कर्ज घेऊ शकता. दोघेही कमावते असल्यास आपण आपल्या जोडीदारासह संयुक्त गृह कर्जाचा पर्याय निवडू शकता.

यामुळे कर्जाच्या रकमेची पात्रता वाढेल. म्हणजेच तुम्हाला अधिकचे कर्ज मंजूर होणार आहे. तसेच ईएमआयचे ओझे देखील कमी होईल. तुम्ही तुमच्या पत्नी समवेत जॉईंट होम लोन घेतले तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज सुद्धा मिळणार आहे. तसेच तुम्हाला कर सवलतीचा सुद्धा अधिकचा लाभ मिळणार आहे.

कर्ज रीपेमेंट कालावधी वाढवा : बँकांकडून जास्तीत जास्त तीस वर्ष कालावधीसाठी गृह कर्ज दिले जाते. परंतु जर तुमचे वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीचे वय लक्षात ठेवून, बँक 30 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज ऑफर करणार नाही.

परंतु जर आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल अन तुमची नोकरी पक्की असेल, तर आपण बँकेला सेवानिवृत्तीनंतरही कर्जाचा कालावधी वाढविण्यासाठी पटवून देऊ शकता. म्हणजे कर्ज रिपेमंट कालावधी वाढवा ज्यामुळे तुमचा EMI बोजा कमी होणार आहे.

एकरकमी कर्ज भरण्याचा प्रयत्न करा : आपल्या गृह कर्जाची परतफेड आपल्या सेवानिवृत्तीबरोबरचं संपली तर आपल्यासाठी चांगले राहणार आहे. यासाठी, आपण बोनस, ग्रॅच्युइटी किंवा कोणत्याही भांडवलासह कर्जाची एकरकमी परतफेड करू शकता. जर तुम्हाला कुठूनही एकरकमी पैसे मिळाले तर आपण त्यातून एकरकमी परतफेड करू शकता. परंतु सेवानिवृत्ती कॉर्पसचा होम लोन फेडण्यासाठी वापर करणे टाळा.

डाऊन पेमेंट ची रक्कम वाढवा : तुम्हाला चाळीसाव्या वर्षी घर घ्यायची असेल आणि यासाठी गृह कर्ज घेणार असाल तर गृह कर्जासाठीच्या डाऊन पेमेंटची रक्कम तुम्ही अधिक ठेवायला हवी. डाऊन पेमेंट अधिक केले तर तुम्हाला कर्ज फेडताना मोठी मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe