iQOO Neo 10R Smartphone:- iQOO लवकरच आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी कंपनीने या डिव्हाइसचे टीझिंग सुरू केले आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह येणार आहे.
आकर्षक डिझाइन आणि डिस्प्ले
iQOO Neo 10R मध्ये 6.78-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले असेल जो उच्च रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स ब्राइटनेस सपोर्ट करेल. यामुळे अतिशय स्पष्ट आणि शानदार व्हिज्युअल अनुभव मिळणार आहे. लीकनुसार हा फोन आकर्षक जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फिनिशमध्ये येऊ शकतो.ज्यामुळे त्याला प्रीमियम लुक मिळतो.
दमदार प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 SoC प्रोसेसरसह येणार असून तो अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली असेल. यामध्ये भरपूर रॅम आणि स्टोरेज पर्याय मिळतील. जे गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उपयुक्त ठरेल. तसेच Android 15 ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे फोनचा परफॉर्मन्स अत्यंत स्मूद आणि जलद असेल.
उत्कृष्ट कॅमेरा
iQOO Neo 10R मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50MP सोनी LYT600 मुख्य कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP सॅमसंग S5K3P9 फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा सेटअप लो-लाइट फोटोग्राफीसाठी उत्तम ठरणार आहे.
बॅटरी आणि चार्जिंग टेक्नॉलॉजी
iQOO Neo 10R मध्ये 6400mAh बॅटरी असेल जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होईल आणि दिवसभर बॅटरी टिकण्याची शक्यता आहे.
इतर फीचर्स आणि संरक्षण
IP64 सर्टिफिकेशन असून जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करेल तसेच NFC सपोर्टमुळे डिजिटल पेमेंट करणे शक्य होईल. जलद कनेक्टिव्हिटी साठी WiFi 6 आणि ब्लूटूथ सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
भारतातील संभाव्य किंमत
लीक्सनुसार iQOO Neo 10R ची किंमत 24,999 रुपये असू शकते. जर ही माहिती खरी ठरली, तर हा स्मार्टफोन Snapdragon 8s Gen 3 SoC असलेला सर्वात स्वस्त फोन ठरेल. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.त्यामुळे अधिक अचूक माहितीसाठी अधिकृत लाँचची वाट पाहणे गरजेचे ठरणार आहे.