मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर येथे ३० तास पाणीपुरवठा बंद!

Ahmednagarlive24
Published:

Mumbai News : मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 5 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही माहिती दिली आहे.

बीएमसीच्या माहितीनुसार, पवई अँकर ब्लॉक आणि मरोशी वॉटर शाफ्ट दरम्यान 2400 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 1800 मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम पाइपलाइनचे पृथक्करण करून नवीन पाइपलाइन कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीच 30 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार

🔹 एस वॉर्ड:
भांडुप पश्चिम आणि परिसरातील श्रीराम पाडा, खिंडी पाडा, तुळशेत पाडा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी, टेंभी पाडा, एलबीएस रोड, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंप, शिंदे मैदान, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, हनुमान टेकडी, अशोक टेकडी या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

🔹 एल प्रभाग:
कुर्ला दक्षिणेतील काजू पाडा, सुंदरबाग, नव पाडा, हलव पूल, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, पाईपलाइन रोड, एलबीएस मार्ग तसेच कुर्ला उत्तरमधील ९० फूट रोड, कुर्ला-अंधेरी रोड, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकी विहार रोड या भागांमध्येही पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प राहणार आहे.

🔹 जी उत्तर प्रभाग:
धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, दिलीप कदम रोड, जास्मिन मील रोड, माहीम गेट, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास रोड, 60 फूट रोड, 90 फूट रोड, धारावी लूप रोड या ठिकाणी पाणीकपात होणार आहे.

🔹 के पूर्व प्रभाग:
विजय नगर मरोळ, मिलिटरी मार्ग, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, सहार व्हिलेज यासह माहेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी १ व २, हनुमान नगर, शहीद भगतसिंग कॉलनी, विमानतळ रोड परिसर, सागबाग, मरोळ एमआयडीसी परिसर याठिकाणीही पाणीपुरवठा बंद राहील.

🔹 एच पूर्व प्रभाग:
वांद्रे टर्मिनस, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर या भागांतही पाणीकपातीचा मोठा परिणाम होणार आहे.

मुंबईकरांनी काय काळजी घ्यावी?

30 तासांचा पाणीकपात असल्याने नागरिकांनी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. घरगुती पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा. हॉटेल, रुग्णालये आणि व्यावसायिक आस्थापनांनी देखील आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा.

मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला जाईल. तरीही, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe