शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ! ‘ही’ कंपनी देणार एक शेअरवर एक फ्री बोनस शेअर

ईएफसी इंडिया लिमिटेड या कंपनीने सुद्धा याच काळात आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. बोनस शेअरची घोषणा केल्यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने फ्री बोनस शेअर साठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे.

Tejas B Shelar
Published:

Share Market Bonus Share News : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी फ्री बोनस शेअरची घोषणा केली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

यासोबतच काही कंपन्यांनी बोनस शेअरची देखील घोषणा केली आहे. तिमाही निकाल जाहीर झाला की कंपन्यांच्या माध्यमातून बोनस शेअरची घोषणा केली जाते आणि अशीच एक मोठी घोषणा ईएफसी इंडिया लिमिटेड या कंपनीने केली आहे.

प्रत्येकच कंपनी बोनस शेअरची घोषणा करत नाही मात्र ज्या कंपन्यांना बोनस शेअरची घोषणा करायची असते त्या कंपन्या तिमाही निकालाच्या दरम्यान याबाबत घोषणा करतात. ईएफसी इंडिया लिमिटेड या कंपनीने सुद्धा याच काळात आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

बोनस शेअरची घोषणा केल्यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने फ्री बोनस शेअर साठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे. अशा स्थितीत आज आपण कंपनीने फ्री बोनस शेअरबाबत नेमकी काय घोषणा केली आहे? याबाबतची सविस्तर डिटेल पाहणार आहोत.

ईएफसी इंडिया लिमिटेडची मोठी घोषणा

ई एफ सी इंडिया लिमिटेड कंपनीकडून एक शेअर साठी एक बोनस शेअर दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या पात्र गुंतवणूकदारांना 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअर्ससाठी बोनस शेअर दिला जाईल. या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट 30 जानेवारी जाहीर करण्यात आली आहे.

कंपनीने जाहीर केले आहे की बोनस शेअर्ससाठी मंगळवार 11 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. खरे तर या कंपनीने याआधी कधीच बोनस शेअर दिलेला नाही. ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर देत आहे. मात्र या कंपनीने आधी स्टॉक स्प्लिट केले होते. त्यावेळी कंपनीने १० रुपये अंकित मूल्य असलेल्या शेअर्सची ५ भागांत विभागणी केली होती.

या शेअर स्प्लिटनंतर म्हणजे विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति शेअरपर्यंत घसरली. 2023 मध्ये कंपनीने आपल्या शेअर्सचे विभाजन केले होते. आता कंपनीने फ्री बोनस शेअरची घोषणा केली आहे. आता आपण या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय याबाबत माहिती पाहणार आहोत.

ईएफसी इंडियाने गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय?

शुक्रवारी हा स्टॉक ५३१ रुपयांवर क्लोज झाला अर्थात यामध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. पण गेल्या 2 आठवड्यात या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिक अन 6 महिन्यात धारण 1.47 टक्के घसरण झाली. पण, सर्व चढ-उतारांच्या दरम्यान कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना 1 वर्षात 212 टक्के परतावा दिला आहे अन मागील ५ वर्षात शेअरने 111 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

अर्थातच ज्या गुंतवणूकदारांनी पाच वर्षांपूर्वी यात गुंतवणूक केली होती त्यांना या काळात चांगला परतावा मिळाला आहे. दरम्यान आता फ्री बोनस शेअरच्या घोषणेनंतर या स्टॉकच्या पुढील कामगिरीकडे देखील साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe