IRB Infra Share Price : आय आर बी इन्फ्रा शेअर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या कंपनीचा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आला असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. आज शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसली. आज बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर अन एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वधारून 23413.50 वर खुला झाला.
आय आर बी इन्फ्रास्टॉक बाबत बोलायचं झालं तर आज हा स्टॉक 5.18 टक्क्यांनी वधारला आणि सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 56.58 ट्रेड करत आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आगामी काळात या स्टॉक मध्ये मजबूत तेजी दिसेल असा नवा अंदाज दिला आहे.
ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी आता नवीन टार्गेट प्राईज सुद्धा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेअर बाजारात सध्या या स्टॉकची स्थिती काय आहे आणि यासाठी ब्रोकरेज कडून काय नवीन टारगेट प्राईज देण्यात आली आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
आयआरबी इन्फ्रा शेअरची सध्याची शेअर बाजारातील स्थिती
शेअर बाजारात आयआरबी इन्फ्रा चा स्टॉक आज 56.58 रुपयांवर ट्रेड करतोय. याची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 53.65 रुपये होती. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 78.15 रुपये अन 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 45.06 रुपये इतका आहे. सध्या या इन्फ्रा कंपनीचे एकूण मार्केट कॅप 34,175 Cr. इतके आहे आणि या कंपनीवर सध्या 18,838 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.
आय आर बी इन्फ्रा साठीची नवीन टारगेट प्राईज
६ बाजार विश्लेषकांनी आयआरबी इन्फ्राच्या शेअर्ससाठी सर्वाधिक ८१ रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. दुसरीकडे, आयआरबी इन्फ्रा शेअरची सर्वात कमी टार्गेट प्राइस ६० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
जर बाजार विश्लेषकांनी म्हटल्याप्रमाणे या स्टॉकच्या किमती आगामी काळात 81 रुपयांपर्यंत वाढल्या तर सध्याच्या पातळीपेक्षा यात तब्बल 37% वाढ नमूद होणार आहे.
मात्र गेल्या एका वर्षात या स्टॉकच्या किमतीत 13.21 टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु गेल्या पाच दिवसात या कंपनीचा स्टॉक 11.71 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकच्या किमती 475.36 टक्क्यांनी वाढल्या आहेत.