एका लाखाची गुंतवणूक करून PPF एक कोटी मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल ? पहा…

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये केली जाणारी गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान जर तुम्हालाही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:

PPF Calculator : भारतात फार पूर्वीपासून सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही अनेकजण पोस्टाच्या एफडी, बँकेच्या एफडी किंवा आरडी योजनेत अन पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करताना दिसतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा देखील एक चांगला पर्याय ठरतोय. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. या गुंतवणुकीच्या योजनेतून आतापर्यंत अनेकांनी लाखो रुपयांचे रिटर्न मिळवले आहेत.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये केली जाणारी गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान जर तुम्हालाही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण पीपीएफ मधून जर एक कोटी रुपये मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करावी लागणार याच बाबत सविस्तर आढावा घेणार आहोत.

पीपीएफ योजनेचे स्वरूप कसे आहे?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक गव्हर्मेंट स्कीम असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एफडी पेक्षा अधिकचा रिटर्न मिळतोय. इतर कोणत्याही बचत योजनांपेक्षा पीपीएफ मधून जास्त परतावा मिळत असल्याचे म्हटले जात आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.10% दराने परतावा दिला जात आहे. ही योजना पंधरा वर्षांची आहे.

म्हणजे आज जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत पैसा गुंतवला तर पंधरा वर्षांनी ही योजना पक्व होणार आहे आणि गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीसह व्याजाचे पैसे मिळणार आहेत. मात्र जर गुंतवणूकदाराला पंधरा वर्षाहून अधिक काळासाठी पैसा गुंतवायचा असेल तर मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदाराला पाच-पाच वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढवता येतो.

ही या योजनेची सर्वात मोठी विशेषता असून गुंतवणूकदार या पद्धतीने तब्बल 50 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच गुंतवणूकदाराला जर लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करून चांगला पैसा मिळवायचा असेल तर पीपीएफ हा सर्वोत्कृष्ट पर्याय ठरेल असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

जर तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील सरकारी बँकेत किंवा पोस्टात जाऊन याचे अकाउंट ओपन करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये वर्षाला किमान 500 रुपयांपासून ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. म्हणजेच गुंतवणूकदार एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतात.

या योजनेत गुंतवणूकदार मासिक म्हणजेच प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करू शकतात किंवा एक रकमी गुंतवणूक देखील करता येते. आता आपण दरवर्षी पीपीएफ मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला एक कोटी रुपये कधी मिळणार याची कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

PPF चे संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा?

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ अकाउंट मध्ये दरवर्षी एक लाख रुपये गुंतवलेत तर त्याला 7.10 टक्के दराने एक कोटी रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी तब्बल तीस वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. दरवर्षी एक लाखाची गुंतवणूक करून तीस वर्षानंतर गुंतवणूकदाराला PPF मधून एक कोटी तीन लाख 607 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये सदर गुंतवणूकदाराची गुंतवणुकीची रक्कम ही 30 लाख रुपये राहणार आहे आणि उर्वरित 73 लाख 607 रुपये व्याज म्हणून त्या गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत. पण जर पीपीएफ च्या व्याजदरात बदल होत राहिला तर गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या रिटर्न मध्ये देखील बदल होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe