Mutual Fund मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? मग ‘या’ 5 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा आणि श्रीमंत व्हा!

शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवलाय. याशिवाय शेअर मार्केट पेक्षा कमी जोखमीच्या म्युच्युअल फंड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैसा लावला जातोय. दरम्यान, जर तुम्ही आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा सुद्धा दिला आहे. भारतात आधी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व होते. रिटर्न कमी मिळाले तरी चालतील पण गुंतवलेला पैसा वाया गेला नाही पाहिजे अशी भावना गुंतवणूकदारांची होती.

मात्र आता गुंतवणूकदाराचा माईंड सेट पूर्णपणे चेंज झाला आहे. गुंतवणूकदार आता रिस्क घेण्यास तयार आहेत आणि यामुळे शेअर मार्केटमध्ये अलीकडील काही वर्षांमध्ये गुंतवणूक वाढलीये. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवलाय.

याशिवाय शेअर मार्केट पेक्षा कमी जोखमीच्या म्युच्युअल फंड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैसा लावला जातोय. दरम्यान, जर तुम्ही आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.

खरंतर म्युच्युअल फंड हे देखील शेअर बाजारावर आधारित आहे. पण म्युच्युल फंड मध्ये एवढी जोखीम पाहायला मिळत नाही. येथील जोखीम ही शेअर मार्केटच्या तुलनेने कमी आहे. म्हणून ज्या लोकांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही ते सुद्धा लोक म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतात.

पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा ठरवलं तर कोणत्या फंडात गुंतवणूक करावी हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. म्हणून आज आपण गेल्या दहा वर्षांच्या काळात कोणत्या टॉप म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना घसरणीच्या काळातही चांगला जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

10 वर्षात सर्वाधिक रिटर्न देणारे टॉप 5 म्युच्युअल फंड

आयसीआयसीआय प्रूडेन्शियल ब्लूचिप फंड : दहा वर्षात सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या टॉप पाच म्युच्युअल फंडांच्या यादीत या फंडाचा पहिला नंबर लागतो. या जबरदस्त फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील दहा वर्षांत चक्क 12.53% दराने परतावा दिला आहे. हा या फंडाने दिलेला सरासरी परतावा असून या फंडाची व्हॅल्यू 61714.99 कोटी रुपये आहे.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड : निपोन इंडिया लार्ज कॅप फंड या यादीतला दुसरा म्युच्युअल फंड. दहा वर्षांचा रेकॉर्ड पाहिला असता या म्युच्युअल फंड आणि आपल्या गुंतवणूकदारांना 12.46% परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा मागील दहा वर्षांत मिळालेला सरासरी परतावा आहे. या फंडाची फंड व्हॅल्यू 34517.63 कोटी रुपये आहे. जर तुम्हाला आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर हा फंड तुमच्या फायद्याचा असेल. तुम्ही या फंडाबाबत नक्कीच विचार करू शकता.

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड : या यादीत कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंडाचा तिसरा क्रमांक लागतो. दहा वर्षात सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या फंडाने 10 वर्षातील रेकॉर्डमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 12.07% परतावा दिला आहे. या फंडाची फंड वॅल्यू 14,196.78 कोटी रुपयांची आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये हा देखील फंड विशेष लोकप्रिय असल्याचे बोलले जात आहे.

एसबीआय ब्ल्यूचीप फंड : एसबीआय ब्लूचिप फंड गुंतवणूकदारांसाठी मोठा फायद्याचा ठरला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये याने आपल्या गुंतवणूकदारांना 11.62% दराने परतावा दिलाय. या फंडाची व्हॅल्यू 48062.06 कोटी रुपये आहे. यामुळे जर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा फंड त्यांच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.

कोटक ब्लूचिप फंड : या यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच पाचव्या क्रमांकावर येतो तो कोटक ब्ल्यूचिप फंड. हा फंड गेल्या दहा वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरलाय. या फंडाने देखील आपल्या गुंतवणूकदारांना भरभक्कम परतावा दिला आहे. या Fund ने मागील दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 11.24% दराने परतावा दिला आहे. या फंडाची AUM व्हॅल्यू 9,025.47 कोटी रुपये आहे. गुंतवणुकीसाठी हा देखील फंड गुंतवणूकदारांच्या फायद्याचा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe