टाटा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, ‘इतक्या’ हजाराच्या SIP मधून मिळाला 1,06,81,334 रुपयांचा परतावा !

शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा सुद्धा मिळतोय. दरम्यान आज आपण अशा एका म्युच्युअल फंडाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना काही हजाराची गुंतवणूक करून कोट्यावधी रुपयांचा रिटर्न मिळाला आहे.

Tejas B Shelar
Published:

Tata Mutual Fund Scheme : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे. खरे तर भारतात आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची आणि पोस्टाची एफडी योजना तसेच आरडी योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

पण अलीकडील काही वर्षांमध्ये अधिकचा परतावा मिळावा या अनुषंगाने गुंतवणूकदारांच्या माध्यमातून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट केली जात आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा सुद्धा मिळतोय.

दरम्यान आज आपण अशा एका म्युच्युअल फंडाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना काही हजाराची गुंतवणूक करून कोट्यावधी रुपयांचा रिटर्न मिळाला आहे. टाटा इक्विटी पीई फंड असे या म्युच्युअल फंडचे नाव असून या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत जोरदार रिटर्न दिले आहेत.

Tata Mutual Fund कधी सूरु झाला?

टाटा समूह हा देशातील सर्वात मोठा उद्योग समूह. हा उद्योग समूह जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आहे. म्युच्युअल फंड मध्ये देखील टाटा समूहाचे वर्चस्व असून हा फंड 2004 मध्ये सुरू झाला.

या म्युच्युअल फंड बाबत बोलायचं झालं तर जुलै 2024 पर्यंत टाटा म्युच्युअल फंडाचे 61,70,000 पेक्षा जास्त ग्राहक होते. त्याची मालमत्ता 1,76,521.34 कोटी रुपये इतके होते.

टाटा म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदार झालेत करोडपती

टाटा म्युच्युअल फंड 2004 मध्ये सुरू झाले आहे. तेव्हापासून या म्युच्युअल फडने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या दहा वर्षांमध्ये एव्हरेज 13.87% दराने परतावा दिला आहे. तसेच स्थापनेपासून आतापर्यंत 18.49% दराने परतावा दिला आहे.

यामुळे जर कोणी जून 2004 पासून या म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक महिन्याला 7000 रुपयांची एसआयपी केली असेल अन ही एस आय पी आजपर्यंत म्हणजे सलग 20 वर्ष कायम ठेवली असेल तर या गुंतवणूकदाराला एकूण 1,06,81,334 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणुकीची रक्कम 16 लाख 80 हजार रुपये असेल आणि उर्वरित रक्कम हे गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात मिळणारे रिटर्न राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe