Jio Airtel and Vi Popular Recharge Plan : तुम्हालाही दिवसाला दीड किंवा दोन जीबी डेटा पुरत नाही का ? मग आज आम्ही तुम्हाला अशा रिचार्ज प्लान ची माहिती सांगणार आहोत ज्याने रिचार्ज केल्यास तुम्ही अनलिमिटेड डेटा मिळू शकता. महत्त्वाचे म्हणजे आज आम्ही जिओ, एअरटेल आणि Vi अशा तीनही कंपन्यांच्या अनलिमिटेड 5g डेटा मिळणाऱ्या प्लॅनची माहिती सांगणार आहोत.
खरे तर जिओ, एअरटेल आणि Vi या तीनही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी दररोज तीन जीबी डेटावाले प्लॅन ऑफर करत आहेत. हे प्लॅन अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतात ज्यांना दीड, दोन जीबी डेटा पुरत नाही. विशेषता मुव्हीज पाहणारे, गेम खेळणारे आणि क्रियटर लोकांना कमी डेटा मिळणारे प्लॅन पुरत नाहीत.
म्हणून अशा ग्राहकांनी तीन जीबी डेटा मिळणाऱ्या प्लॅनने रिचार्ज करायला हवे. पण तुम्हाला डेली 3Gb डेटा मिळणारे अन ग्राहकांना परवडणाऱ्या प्लॅनबाबत माहितेय का? नाही ना मग आज आम्ही तुम्हाला अशाच बजेट फ्रेंडली प्लॅनची माहिती सांगणार आहोत.
हे आहेत जिओचे फायदेशीर प्लॅन
Jio चा Rs 1799 प्रीपेड प्लॅन : हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा (एकूण 252GB) आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनचे ग्राहक अमर्यादित 5G डेटासाठी देखील पात्र आहेत. प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रीप्शन देखील मिळते. सोबतच नेटफ्लिक्स (बेसिक) चे मोफत सबस्क्रिप्शन सुद्धा यात समाविष्ट आहे.
जिओचा 1199 रुपयांचा प्लॅन : हा सुद्धा 84 दिवसाचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज तीन जीबी डेटा मिळतो अनलिमिटेड कॉल अन अनलिमिटेड 5g डेटा सुद्धा या प्लॅनच्या ग्राहकांना दिला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे डेली 100 एसएमएस सुद्धा फ्री मिळतात. जिओ टीव्ही जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रीप्शन सुद्धा मिळते.
जिओचा 449 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा दिल्या जातात पण या प्लॅनची व्हॅलिडीटी ही फक्त 28 दिवसांची आहे.
हे आहेत एअरटेलचे फायदेशीर प्लॅन
एअरटेलचा 1798 चा प्रीपेड प्लॅन : हा प्लॅन सुद्धा 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना दररोज तीन जीबी डेटा मिळतो आणि महत्त्वाचे म्हणजे 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल चा लाभ सुद्धा दिला जातो. अनलिमिटेड 5g डेटा देखील या ग्राहकांना दिला जात आहे. यासोबतच नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन सुद्धा मोफत मिळते. एअरटेल एक्स्ट्रीम अँपचे ऍक्सेस सुद्धा या प्लॅन मुळे मिळते.
एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन : हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा (एकूण 84GB) आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनचे ग्राहक अमर्यादित 5G डेटासाठी देखील पात्र आहेत. या प्लॅनमध्ये Airtel Extreme Play Premium (22+ OTTs), स्पॅम कॉल आणि SMS अलर्ट, Apole 24/7 सर्कल आणि फ्री HelloTunes सारखे फायदे सुद्धा मिळतात.
Airtel चा 549 रुपयाचा प्रीपेड प्लॅन : हा प्लान सुद्धा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा (एकूण 84GB) आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनचे ग्राहक अमर्यादित 5G डेटासाठी देखील पात्र आहेत. प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल, एअरटेल एक्स्ट्रीम प्ले प्रीमियम (22+ ओटीटी), स्पॅम कॉल आणि SMA रिप्स, अपोले 24/7 सर्कल आणि विनामूल्य HelloTunes यांसारखे फायदे सुद्धा समाविष्ट आहेत.
हे आहेत Vi चे फायदेशीर प्लॅन
Vi चा Rs 795 प्रीपेड प्लॅन : हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा (एकूण 168GB) आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी ViMTV (16 OTTs) सबस्क्रिप्शन, अर्धा दिवसासाठी म्हणजे 12AM ते 12PM पर्यंत अमर्यादित डेटा, डेटा डिलाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर यांसारखे फायदे समाविष्ट आहेत.
Vi चा Rs 449 प्रीपेड प्लॅन : हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा (एकूण 84GB) आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी ViMTV (16 OTTS) सबस्क्रिप्शन, अर्धा दिवस म्हणजेच 12AM ते 12PM पर्यंत अमर्यादित डेटा, डेटा डिलाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर यांसारखे फायदे समाविष्ट आहेत.