PPF योजना बनवणार लखपती ! 1.5 लाखाच्या गुंतवणुकीतून मिळणार 1 कोटी 54 लाखांचा परतावा, पहा संपूर्ण गणित

सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजना, आरडी योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांमध्ये आणि सरकारच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत.

Tejas B Shelar
Published:

PPF Scheme : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यांसारख्या अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. मंडळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजना, आरडी योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांमध्ये आणि सरकारच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत.

दरम्यान आज आपण अशाच एका सुरक्षित बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

केंद्रातील सरकारकडून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना राबवली जाते. भारतीय नागरिकांना या योजनेतून गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय उपलब्ध होतो. यातून गुंतवणूकदारांना एफडी व इतर बचत योजनांच्या तुलनेत लॉन्ग टर्ममध्ये अधिकचा परतावा मिळतोय.

ही योजना पंधरा वर्षांसाठी आहे. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा दिला जातोय. महत्त्वाचे म्हणजे योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढेही गुंतवणूकदार पाच पाच वर्षांनी या योजनेचा कालावधी एक्सटेंड करू शकतात.

योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांनी एक्सटेंड करून हा कालावधी तब्बल 50 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो. यामध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा तुमच्या जवळील बँकेत जाऊन याचे अकाउंट ओपन करू शकता आणि गुंतवणूक सुरू करू शकता.

या योजनेत वार्षिक 500 रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. या योजनेत तुम्ही मासिक आधारावर किंवा मग वार्षिक आधारावर एक रकमी गुंतवणूक करू शकता.

महत्त्वाची बाब अशी की पीपीएफ योजनेत गुंतवलेल्या रकमेवर ग्राहकांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. ग्राहक जेवढी रक्कम यामध्ये गुंतवतात त्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम त्यांना कर्ज स्वरूपात मिळते.

तसेच योजनेचा कालावधी पाच वर्ष झाल्यानंतर ग्राहकांना यातून 50% पर्यंतची रक्कम काढता सुद्धा येते. म्हणजेच मध्येच जर पैशांची अडचण आली तर ती अडचण देखील पूर्ण होऊ शकते. आता आपण या योजनेतून दीड कोटींचा परतावा कसा मिळणार हे थोडक्यात पाहणार आहोत.

कसे मिळणार दीड कोटी रुपये?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक सलग तीस वर्षांसाठी करण्यात आली तर ग्राहकांना तीस वर्षांनी एक कोटी 54 लाख 50 हजार 911 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणुकीची रक्कम 45 लाख रुपये एवढी राहणार आहे आणि उर्वरित एक कोटी नऊ लाख 50 हजार 911 रुपये व्याज म्हणून ग्राहकाला रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe