Income Tax Calculator : 1 फेब्रुवारी 2025 हा एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्य करदात्यासाठी एक मोठी घोषणा केली. काल तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकारने पहिल्यांदाच आपला पूर्ण अर्थसंकल्प मांडला.
कालच्या या महत्त्वाच्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले आहे की, 12 लाखांपर्यंत पगाराच्या करदात्यांना नवीन कर प्रणालीअंतर्गत कोणताही कर भरावा लागणार नाही. केंद्रीय मंत्र्यांनी कर स्लॅबमध्ये बदल करण्याचीही घोषणा केली.
आता नवीन कर प्रणालीअंतर्गत 12 लाख रुपयांच्या कमाईवर शून्य आयकर आकारला जाणार आहे. आता यात जर 75,000 रुपये मानक वजावट म्हणजेच स्टॅंडर्ड डिडक्शन 75 हजार रुपये त्यात जोडले गेले तर एकूण 12.75 लाख रुपयांपर्यत टॅक्स लागणार नाही.
याचा अर्थ असा की ज्या लोकांना 12,75,000 रुपये पगार मिळतो त्यांना कर भरावा लागणार नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्यांचा पगार 12 लाख 75 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना किती कर भरावा लागेल. दरम्यान आज आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
12.75 लाखाहून अधिक पगारावर किती कर?
जर करदात्यांचा पगार 12.75 लाख रुपयांपेक्षा एक रुपया सुद्धा जास्त असेल तर अशा व्यक्तीला कर भरावा लागणार आहे. १२.७५ लाख रुपयांपेक्षा एक रुपया जास्त पगार असणाऱ्या लोकांना एकूण 76 हजार रुपये कर भरावा लागणार आहे.
20 लाखांच्या उत्पन्नावर किती कर लागणार?
जर आपला वार्षिक पगार 20 लाख रुपये असेल तर आपल्याला किती कर भरावा लागणार? जे लोक दरवर्षी 16 लाखाहून अधिक कमाई करतात ते 20 लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये प्रवेश करतात. सरकारने जारी केलेल्या कर स्लॅबनुसार, सध्या २० लाखांपर्यंतची कमाई करणाऱ्यांना 20 टक्के दराने 2.90 लाख रुपयांचा कर भरावा लागतो. मात्र नवीन घोषणेनंतर ही रक्कम 2 लाख रुपयापर्यंत कमी होणार आहे.
24 लाखांच्या कमाईवर किती कर भरावा लागणार?
20 लाखाहून अधिक पगार मिळवणाऱ्या लोकांसाठी एक नवीन कर स्लॅब राहणार आहे. वीस लाखाहून अधिक आणि 24 लाख रुपयांपर्यंतची कमाई करणाऱ्या लोकांचा या स्लॅब मध्ये समावेश होतो.
या स्लॅबमध्ये येणार्या करदात्यांना 25 टक्के कर भरावा लागतो. सध्या या कर स्लॅबमध्ये असलेले लोक 4.10 लाख रुपयांपर्यंत कर भरतात. पण नवीन घोषणेनंतर त्यांना 3 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
24 लाखाहून अधिक कमाई असणाऱ्यांना किती कर भरावा लागणार
24 लाखांपेक्षा अधिक आणि 50 लाख रुपयांपर्यंतची कमाई असणाऱ्या लोकांसाठी एक नवीन स्लॅब असतो. या स्लॅब मध्ये येणाऱ्या लोकांना 30 टक्के कर भरावा लागतो. समजा, जर कोणी दरवर्षी 50 लाख लाख रुपये कमावत असेल तर त्यास 30 टक्के कर आकारला जाईल.
म्हणजेच जो व्यक्ती 50 लाख रुपये कमवतोय त्याला सध्या 11.90 लाख रुपये कर भरावा लागतोय. परंतु नवीन घोषणेनंतर त्याला फक्त 10.80 लाख रुपये भरावे लागणार आहेत.