FD गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! सरकारने केली मोठी घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर अर्थसंकल्प 2025 तुम्हाला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात FD मधून मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर कर सवलतीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.

Published on -

Fixed Deposit Interest Rate:- जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर अर्थसंकल्प 2025 तुम्हाला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात FD मधून मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर कर सवलतीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळेल आणि टॅक्स कपातीचा भार कमी होईल. विशेषत: टीडीएस (TDS) मर्यादा 40,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्याचा फायदा लाखो गुंतवणूकदारांना होईल.

नवीन टीडीएस नियम काय?

जर तुमचे वय 35 वर्षे असेल आणि तुम्हाला वार्षिक FD व्याज 50,000 रुपये मिळत असेल तर या नव्या नियमांनुसार कोणतीही TDS कपात होणार नाही. याचा अर्थ 50,000 रुपयांपर्यंत FD व्याज करमुक्त असेल. मात्र जर व्याज 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यावर TDS लागू होईल.

उदाहरणार्थ जर तुम्ही 75,000 रुपयांचे व्याज मिळवत असाल तर ते तुमच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केले जाईल आणि करप्रणालीनुसार त्यावर कर लागू होईल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12.75 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर TDS कपात झाल्यास तो रिटर्न दाखल करताना परत मिळू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी सवलत

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या अर्थसंकल्पात विशेष कर सवलत देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी FD व्याजावरील TDS मर्यादा 50,000 रुपयांवरून 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक पैसे बचत करू शकतील आणि त्यांच्या निवृत्तीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवू शकतील.

TDS कसा लागू होतो?

TDS म्हणजे ‘टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स’ म्हणजेच उत्पन्नाच्या ठिकाणीच कर कपात केली जाते.जर तुम्ही पगारदार असाल तर कंपन्या तुमच्या पगारातून TDS कपात करतात. फिक्स्ड डिपॉझिटच्या बाबतीतही बँक व्याजावर TDS कपात करते.

जर तुमचे पॅन कार्ड उपलब्ध असेल तर 10% TDS कपात केली जाते.पॅन कार्ड नसल्यास 20% TDS लागू होतो.जॉईंट FD खात्यात मुख्य खातेधारकाच्या नावावर TDS लागू होतो.

FD गुंतवणुकीसाठी कोणत्या बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर?

जर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. खाली काही बँकांचे नवीनतम व्याजदर दिले आहेत

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

कमाल व्याजदर 8.60%, एक वर्षाचा व्याजदर 8.05%, तीन वर्षाचा व्याजदर 8.60% आणि पाच वर्षाचा व्याजदर 8.25% इतका मिळतो.

एचडीएफसी बँक

कमाल व्याजदर 7.40, एक वर्षाचा व्याजदर 6.60% तीन वर्षाचा व्याजदर 7% आणि पाच वर्षाचा व्याजदर 7% इतका मिळतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

कमाल व्याजदर 7.25%, एक वर्षाचा व्याजदर 6.80%,3 वर्षाचा व्याजदर 6.75% आणि 5 वर्षाचा व्याजदर 6.50% इतका मिळतो.

बंधन बँक

कमाल व्याजदर 8.05%, एक वर्षाचा व्याजदर 8.05%, तीन वर्षाचा व्याजदर 7.25% आणि पाच वर्षाचा व्याजदर 5.85% इतका मिळतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

कमाल व्याजदर 8.50%, एक वर्षाचा व्याजदर 8%, तीन वर्षाचा व्याजदर 8.50% आणि पाच वर्षाचा व्याजदर 7.75% इतका मिळतो.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

कमाल व्याजदर 8.25%, एक वर्षाचा व्याजदर 8.25%, तीन वर्षाचा व्याजदर 7.20% आणि पाच वर्षाचा व्याजदर 7.20% इतका मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe