Stock To Buy : एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प ठरला. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. पण हा अर्थसंकल्प प्रामुख्याने आयकर सवलतीच्या माध्यमातून कन्जप्शन सेगमेंटवर केंद्रित राहिला आहे. सरकारने जाहीर केले की आता नवीन आयकर प्रणाली अंतर्गत, आता बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार आहे.
वित्तीय तुटीचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2025 साठी GDP च्या 4.8 टक्के आणि आर्थिक वर्ष 2026 साठी 4.4 टक्के ठेवण्यात आले होते. दरम्यान करदात्यांना सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याने आता करदात्याकडे अधिक पैसा शिल्लक राहिला आणि त्यामुळे सर्वसामान्यांची खर्च करण्याची तयारी अधिक राहणार आहे. यामुळे खपात मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा फायदा उद्योग जगताला होणार आहे.
दरम्यान अर्थसंकल्पात घेण्यात आलेल्या याच निर्णयामुळे आता स्टॉक मार्केट विश्लेषकांनी 9 असे स्टॉक सुचवले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे. हे स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असा विश्वास स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून व्यक्त होतोय.
पीजी इलेक्ट्रोप्लास्ट : पीजी इलेक्ट्रोप्लास्टने एक मजबूत अपट्रेंड कायम ठेवला आहे, ज्यामध्ये झालेली घसरण मुख्य सरासरीच्या जवळ खरेदीदारांना आकर्षित करत आहे. या स्टॉकसाठी Buy रेटिंग देण्यात आली आहे. याची किंमत 951 रुपयांपर्यंत जाऊ शकते असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे अन यासाठी 737 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.
भारत डायनामिक्स : भारत डायनामिक्स हा स्टॉक सुद्धा आगामी काळात मजबूत परतावा देताना दिसेल असे म्हटले जात आहे. या स्टॉकसाठी 1407 रुपयांची टारगेट प्राईज सेट करण्यात आली आहे. तसेच यासाठी 1138 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
टाईम टेक्नोप्लास्ट : अर्थसंकल्पानंतर टाईम टेक्नोप्लास्टच्या स्टॉकमध्येही मजबूत तेजी पाहायला मिळू शकते असे म्हटले जात आहे. या स्टॉकच्या किमती तब्बल 469 रुपयांपर्यंत वाढू शकतात असा दावा करण्यात आला असून यासाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला आहे. परंतु यासाठी 372 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा आहे.
Jubilant Foodworks : स्टॉक मार्केट विश्लेषकांनी हा सुद्धा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 850 रुपयाची टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली असून 685 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Campus Activewear : कॅम्पसचा स्टॉकही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करणार असे म्हटले जात आहे. भारतातील एक लोकप्रिय फुटवेअर कंपनी असून या कंपनीचा स्टॉक आगामी काळात वाढणार असे संकेत मिळतं आहेत. हा स्टॉक 330 पर्यंत जाऊ शकतो असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे म्हणणे असून 290 रुपयांच्या भाव पातळीवर हा स्टॉक खरेदी करायला काही हरकत नाही असेही विश्लेषकांनी सांगितले आहे. परंतु यासाठी 270 रुपयांचा स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे.
झोमॅटो : झोमॅटो चा स्टॉक सध्या 235 रुपयांवर ट्रेड करत असून आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देताना दिसेल. स्टॉक मार्केट विश्लेषकांनी 240 रुपयांवर एक ब्रेक आऊट तयार होत असून हा ब्रेक आऊट हा स्टॉक थेट तीनशे रुपयांवर घेऊन जाईल असे दाखवत असल्याचे म्हटले आहे. यासाठी तीनशे रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे आणि 220 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Eicher Motor : आईसर मोटरचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे म्हटले जात आहे. अर्थसंकल्पानंतर आता या स्टॉक मध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या हा स्टॉक 5,394.50 या पातळीवर ट्रेड करत असून आगामी काळात याच्या किमती पाचशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या स्टॉक साठी स्टॉक मार्केटच्या विश्लेषकांनी 5800 रुपयांचे टार्गेट प्राईज दिले असून पाच हजार रुपयांचा स्टॉप लॉस देखील देण्यात आला आहे.
LIC : एलआयसीचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे म्हटले जात आहे. सध्या हा स्टॉक 848 रुपयांवर ट्रेड करत असून या पातळीवर हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे याच्या किमती 930 ते 980 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे सांगितले जात असून यासाठी आठशे रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर : HUL कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देणार आहे. सध्या हा स्टॉक 2506 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र जेव्हा स्टॉक 2600 रुपयांची पातळी टच करेल त्यानंतर या स्टॉक मध्ये एक मजबूत ब्रेक आऊट तयार होईल अन हा स्टॉक 2740 ते 2800 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. या स्टॉक साठी 2740 ते 2800 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली असून 2420 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.