Income Tax 2025 : काल केंद्रातील सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर काल पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या. दरम्यान कालच्या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. आता पगारदार लोकांचे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आले आहे.
87A अंतर्गत सध्याच्या नवीन आयकर प्रणालीनुसार, 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे कर शून्य बनवण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कलम 87A अंतर्गत सूट मिळते. ही सूट 25,000 रुपये आहे.
दरम्यान काल, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर शून्यावर आणण्यासाठी ही सवलत 60,000 रुपये केली आहे. मात्र प्रत्यक्षात पगारदार लोकांना तेरा लाखाच्या उत्पन्नावर सुद्धा टॅक्स द्यावा लागणार नाही. मित्रांनो सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे कर शुन्य केले आहे.
यात आता स्टॅंडर्ड डिडक्शन सामील केल्यानंतर 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर शून्य होते. तयामध्ये मार्जिन रिलीफ जर जोडले गेले तर 13.05 रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर शून्य होणार आहे. कारण की मार्जिन रिलीफ हा जवळपास 30 हजार रुपयांपर्यंत आहे.
म्हणजे सरकारच्या या निर्णयामुळे पगारदार लोकांचा तब्बल 80 हजार रुपयांचा टॅक्स वाचणार आहे. दरम्यान आता आपण 16 लाख, 18 लाख, 20 लाख, 24 लाख आणि 50 लाख उत्पन्न असणाऱ्या पगारदार लोकांना किती टॅक्स द्यावा लागणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती टॅक्स लागणार ?
16 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना आधी 1.70 लाख रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता. पण आता यापुढे या लोकांना फक्त 1.20 लाख रुपयांचा टॅक्स द्यावा लागणार आहे. अर्थातच 16 लाख कमाई असणाऱ्या लोकांचे 50 हजार रुपये वाचणार आहेत.
18 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना आधी दोन लाख तीस हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता एक लाख 60 हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागणार आहे.
20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना आधी दोन लाख 90 हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता फक्त दोन लाख रुपये टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे 20 लाख कमाई असणाऱ्या लोकांचे 90 हजार वाचणार आहेत.
24 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना आधी चार लाख दहा हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता ही टॅक्सची रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच करदात्यांचे तब्बल एक लाख दहा हजार रुपये वाचणार आहेत.
50 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना आधी 11.90 लाख रुपयांचा टॅक्स लागत होता मात्र आता ही टॅक्सची रक्कम 10.80 लाख रुपयांवर आली आहे.