जिओने स्वस्त Recharge Plan केला लॉन्च! 2GB डेटा, कॉलिंग आणि एसएमएस… सर्व काही फक्त…

ट्रायच्या एका आदेशामुळे टेलिकॉम कंपन्यांची तारांबळ उडाली . फक्त व्हॉइस आणि एसएमएस बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करण्याच्या नादात कोणी प्लॅन्स स्वस्त केले,कोणी महाग केले तर कोणी प्लॅन कायमचे बंद करून टाकले.

Ratnakar Ashok Patil
Published:

Jio Affordable Recharge Plan:- ट्रायच्या एका आदेशामुळे टेलिकॉम कंपन्यांची तारांबळ उडाली . फक्त व्हॉइस आणि एसएमएस बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करण्याच्या नादात कोणी प्लॅन्स स्वस्त केले,कोणी महाग केले तर कोणी प्लॅन कायमचे बंद करून टाकले. तर आता रिलायन्स जिओने त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन गुपचूप सादर केला आहे.ज्यात तुम्हाला महिनाभर इंटरनेट वापरता येईल.

जिओचा 189 रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओने भारतात 189 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. 189 रुपयांमध्ये Jio तुम्हाला व्हॉईस आणि डेटाचा फायदा घेण्याची संधी देत आहे. काही अहवाल सूचित करतात की, जिओ कडून189 रुपयांचा प्लॅन काही कारणास्तव बंद करण्यात आला होता. जो पुन्हा लाँच केला जात आहे.

जिओने 189 रुपयांच्या प्लॅनसाठी एक नवीन पॅक तयार केला आहे ज्याचे “affordable pack” म्हणून वर्गीकरण केले आहे. 189 रुपयांचा हा प्लॅन 2 जीबी लंपसम डेटा ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2 जीबी “हाय-स्पीड” 4 जी डेटा देतो. या प्लॅनवर 5 जी उपलब्ध नाही.

या प्लॅनवर मिळणाऱ्या सुविधा

189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 300 एसएमएस आणि 2 जीबी डेटासह येतो. 189 रुपयांमध्ये जिओ 14 दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित 5जी आणि जिओ सावन प्रो सारखे ओटीटी फायदे तर प्रतिदिन 2 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे.

हा प्लॅन अशा वेळी लाँच करण्यात आला जेव्हा अशी अफवा पसरली की, जिओ त्याच्या व्हॉइस, एसएमएस प्लॅनवर डेटाला परवानगी देत ​​नाही. या गोंधळामुळे जिओला अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.

पण Jio ने Financialexpress.com ला पुष्टी केली आहे की, नवीन 448 आणि 1747 रुपयांच्या प्लॅनचे सदस्यत्व घेणारे ग्राहक डेटा पॅकसह रिचार्ज करू शकतात. हे डेटा पॅक जसे की, 11 रुपये, 19 रुपये आणि 29 रुपये किंमतीचे सर्व जिओ रिचार्ज प्लॅनद्वारे उपलब्ध आहेत.

TRAI च्या निर्देशानुसार व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी टेलिकॉम कंपन्यांना स्टँडअलोन स्पेशल टॅरिफ व्हाउचर घेणे अनिवार्य केल्यानंतर व्हॉईस आणि एसएमएस योजना सुरू करण्यात आल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe