Yes Bank New FD Rate:- येस बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.ज्यात त्यांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. 31 जानेवारी 2025 पासून लागू झालेल्या या नवीन व्याजदरांमध्ये सर्वसाधारण ग्राहकांसाठी 3.25% ते 7.75% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 8.25% पर्यंत व्याजदर वाढवले आहेत.
या व्याजदर बदलाचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकेने अर्थसंकल्प आणि भारतीय रिझर्व बँकच्या फेब्रुवारीच्या रेपो रेट बैठकीच्या आधी त्याचे व्याजदर सुधारित केले आहेत.
18 महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज
त्यानुसार 18 महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळणार असून जे सामान्य ग्राहकांसाठी 7.75% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25% आहे. येस बँकेच्या या व्याजदरामध्ये सुधारणा 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी लागू होईल.
बँकेने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवर वेगवेगळे व्याजदर सुधारित केले आहेत.ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्वोत्तम व्याजदर निवडण्याची संधी मिळते.
कालावधीनुसार मिळणारा व्याजदर
15 दिवस ते 45 दिवस: 3.70% (सर्वसाधारण), 4.20% (ज्येष्ठ नागरिक)
46 दिवस ते 90 दिवस: 5% (सर्वसाधारण), 4.60% (ज्येष्ठ नागरिक)
91 दिवस ते 120 दिवस: 5% (सर्वसाधारण), 5.25% (ज्येष्ठ नागरिक)
121 दिवस ते 180 दिवस: 5% (सर्वसाधारण), 5.50% (ज्येष्ठ नागरिक)
181 दिवस ते 271 दिवस: 6.25% (सर्वसाधारण), 6.75% (ज्येष्ठ नागरिक)
272 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 6.50% (सर्वसाधारण), 7% (ज्येष्ठ नागरिक)
एक वर्ष: 7.75% (सर्वसाधारण), 8.25% (ज्येष्ठ नागरिक)
1 वर्ष ते 1 वर्ष 18 महिने: 7.75% (सर्वसाधारण), 8.25% (ज्येष्ठ नागरिक)
18 महिने: 8% (सर्वसाधारण), 8.50% (ज्येष्ठ नागरिक)
18 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी: 7.75% (सर्वसाधारण), 8.25% (ज्येष्ठ नागरिक)
24 महिने 1 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा कमी: 7.75% (सर्वसाधारण), 7.75% (ज्येष्ठ नागरिक)
36 महिने ते 60 महिने: 7.75% (सर्वसाधारण), 8% (ज्येष्ठ नागरिक)
60 महिने: 7.75% (सर्वसाधारण), 8% (ज्येष्ठ नागरिक)
60 महिने 1 दिवस ते 120 महिने: 7% (सर्वसाधारण), 7.75% (ज्येष्ठ नागरिक)
या वाढलेल्या व्याजदरामुळे ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. तसेच येस बँकेच्या एफडीवर आकर्षक आणि प्रतिस्पर्धी व्याज मिळवण्याची संधी प्राप्त होईल. येस बँकेच्या या निर्णयामुळे अधिक ग्राहक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.