iQOO Neo 10R स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च! मिळेल 12GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 6400mAh बॅटरी

iQOO Neo 10R Smartphone भारतात लाँच होणार असून खास करून तो निळा आणि पांढऱ्या रंगात सादर केला जाणार आहे. iQOO या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या आगामी डिव्हाइसबद्दल अनेक टीझर्स आणि लीक्स शेअर केले आहेत.ज्यामुळे iQOO Neo 10R बाबत बरीच माहिती समोर आली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

iQOO Neo 10R Smartphone:- iQOO Neo 10R Smartphone भारतात लाँच होणार असून खास करून तो निळा आणि पांढऱ्या रंगात सादर केला जाणार आहे. iQOO या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या आगामी डिव्हाइसबद्दल अनेक टीझर्स आणि लीक्स शेअर केले आहेत.ज्यामुळे iQOO Neo 10R बाबत बरीच माहिती समोर आली आहे.

या फोनमध्ये iQOO च्या सिग्नेचर ड्युअल-टोन डिझाइनचा वापर केला जात आहे. ज्यामुळे त्याच्या आकर्षकतेत आणखी भर पडणार आहे. या स्मार्टफोनच्या भारतातील खास रंगाच्या आवृत्तीत ‘रेजिंग ब्लू’ नावाचा रंग दाखवण्यात आला आहे.

ज्यामध्ये बॅक पॅनल निळ्या रंगात असेल तर बाजू पांढऱ्या रंगात असतील. हा रंग फक्त भारतासाठी डिझाइन करण्यात आलेला आहे आणि इतर बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार नाही.

या स्मार्टफोनमधील फीचर्स

iQOO Neo 10R मध्ये उच्च दर्जाचा प्रोसेसर, स्क्रीन आणि कॅमेरा सेटअप असेल. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर असणार आहे, ज्यामुळे याच्या परफॉर्मन्सला आणखी वेग मिळेल. 1.5k रिझोल्यूशन असलेल्या AMOLED डिस्प्लेसह याचा रिफ्रेश रेट 44 हर्ट्झ असण्याची शक्यता आहे.

ज्यामुळे युजर्सला एक स्मूद अनुभव मिळेल. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी-600 प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असू शकतो.

बॅटरी आणि इतर वैशिष्टे

या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज असू शकते. ज्यामुळे युजर्सला भरपूर स्पेस मिळेल. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन Android 15 आधारित FunTouch OS वर कार्य करेल.

बॅटरीच्या बाबतीत iQOO Neo 10R मध्ये 6400mAh ची मोठी बॅटरी असू शकते. जी चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 10 सिरीजपेक्षा अधिक क्षमता प्रदान करेल.

किती असू शकते किंमत?

iQOO Neo 10R ची किंमत 30 हजारच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या फोनची लाँचिंग तारीख अजून जाहीर केली गेली नाही. परंतु तो या महिन्यात लाँच होईल अशी अपेक्षा आहे. iQOO Neo 10R चे फिचर्स आणि इतर तपशीलांबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe