Personality Test:- आपल्या शरीराच्या हालचाली आणि बसण्याच्या सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. विशेषतः, तुम्ही खुर्चीवर कसे बसता? यावरून तुमच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडू शकतात. चला तर मंडळी जाणून घेऊया खुर्चीवर बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यामागचे अर्थ!
खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून व्यक्तिमत्त्वाची ओळख
पाय क्रॉस करून बसणे
जे लोक खुर्चीवर पाय एकमेकांवर ठेवून बसतात. ते अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे असतात. कोणत्याही परिस्थितीचा सखोल विचार करून निर्णय घेण्याची त्यांची सवय असते.
हे लोक हळूहळू पण ठामपणे पुढे जातात आणि आयुष्यात स्थिरता प्राधान्याने निवडतात. त्यांच्या विचारांमध्ये परिपक्वता असते आणि ते अति भावनिक होण्याच्या ऐवजी परिस्थितीला धरून राहतात.
सरळ बसणे
जे लोक खुर्चीवर अगदी सरळ बसतात. ते आत्मविश्वासाने भरलेले असतात. त्यांच्यात स्पष्ट विचार करण्याची आणि कोणत्याही अडचणींना निर्धाराने तोंड देण्याची ताकद असते.
नेतृत्व करण्याची क्षमता असणारे हे लोक प्रत्येक गोष्टीत ताठ मानेने वावरण्याचा स्वभाव बाळगतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक आकर्षक भारदस्तपणा असतो व ज्यामुळे इतर लोक त्यांना आदराने पाहतात.
वाकून बसणे
काही लोक खुर्चीवर वाकून बसतात.ज्याचा अर्थ ते खूप विचारशील आणि संवेदनशील असतात. हे लोक सहसा गहन विचार करणारे असतात आणि कोणत्याही गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात.
ते मनमिळावू आणि सुसंवाद साधणारे असतात.पण कधी कधी त्यांच्या विचारांच्या गुंत्यात अडकतात. त्यांच्या सहानुभूतीपूर्ण स्वभावामुळे लोक सहज त्यांच्याशी जोडले जातात.
टाचा क्रॉस करून बसणे
जे लोक खुर्चीवर बसताना टाचा एकमेकांवर ठेवतात. ते लाजाळू आणि मितभाषी स्वभावाचे असतात. हे लोक अनोळखी लोकांमध्ये पटकन मिसळत नाहीत आणि नवीन ठिकाणी जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागतो.
त्यांचा आत्मविश्वास थोडा कमी असतो. पण एकदा का ते एखाद्या गोष्टीशी जुळले की ते अत्यंत विश्वासू आणि जबाबदार ठरतात.