३ फेब्रुवारी २०२५ जामखेड : तहसीलच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे.तसेच या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून गावपातळीवर दंवडी देऊन त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.शेतकऱ्यांनो सातबाराला आधारकार्ड लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यातील सर्व ८७ महसुली गावातील सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की, अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे.जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल.ज्या द्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल.
जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पुढील कृषी योजना विषयक लाभ मिळणार नाही तसेच पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते फॉर्मर आयडी बनवल्यानंतरच मिळतील,त्यासाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम सुविधा केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्र याच्याशी संपर्क साधावा.
आपल्या ७/१२ ला आधार लिंक करून घ्यावे व फार्मर आयडी बनवून घ्यावा.या सेवा मोफत उपलब्ध आहेत.त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जावेत.
आधारकार्ड, आधार लिंक मोबाईल क्र. सर्व ७/१२ व ८ अ उतारे, टीप आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.प्रत सर्व महसुल सेवक (कोतवाल) ता. जामखेड आपल्या गावामध्ये सदरिल दवंडी देण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा तपशिल उलट टपाली या कार्यालयास सादर करावा.