दिल्लीत ३ दिवसांनी विकासाचा वसंत फुलणार : मोदी

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाची (आप) निवडणूक निशाणी असलेल्या ‘झाडू’च्या काड्या विखुरल्या आहेत.’आप’ ला उतरती कळा लागली असून त्यांचे नेते पक्ष सोडून जात आहेत,असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चढवला आहे.’वसंत पंचमी’
सोबतच वातावरण बदलत असून दिल्लीत तीन दिवसांनी विकासाचा नवा वसंत फुलणार असल्याचा दावा मोदींनी केला.दिल्लीची सत्ता मिळाल्याने आपण व्यक्तीशः येथील जनतेची सेवा करणार असल्याची ग्वाही मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आर. के. पुरम येथे तिसरी प्रचारसभा घेतली.यावेळी त्यांनी जनतेला वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत आम आदमी पक्षाला ‘आप-त्ती’ संबोधले.मोदी म्हणाले की, मी जनतेचा सेवक आहे.दिल्लीकरांसाठी घोषित केलेल्या गॅरंटीची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही झोपडपट्टीत राहणारे व मध्यमवर्गियांच्या समस्यांवर तोडगा काढणसाठी कठोर मेहनत घेणार आहोत.आम्ही जे वचन देतो, ते शंभर टक्के पूर्ण करतो, असे त्यांनी सांगितले. आपच्या नेत्यांनी दिल्लीला लुटले आहे.

पण,आम्ही सत्तेत येताच त्यांना लुटलेला पैसा परत करावा लागेल.गरीब, शेतकरी,युवक व महिला हे विकसित भारताचे चार स्तंभ आहेत.त्यांच्या भल्यासाठी दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत.यंदाचा अर्थसंकल्प हा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाने प्रत्येक कुटुंबाची झोळी आनंदाने भरली.देशाच्या इतिहासातील पहिल्यांदाच मध्यमवर्गासाठी अनुकूल असा अर्थसंकल्प बनवला आहे.

१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कर सवलत आहे. नेहरू सरकारच्या काळात १२ लाख कमावणाऱ्यांना २.६० लाख रुपये कर भरावा लागायचा. पण, आम्ही जनतेला करातून मोठी सूट दिली. आमचे भ्रष्टाचार मुक्त सरकार गरिबांच्या विकासावर प्रत्येक रुपया खर्च करणार आहे, असा उल्लेख मोदींनी केला. गरिबांना मोफत राशन, पक्के घर, रस्ते, रुग्णालये, उड्डाणपूल बनवणे व मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यावर पैसा खर्च केल्याचे त्यांनी नमूद केले.

दिल्लीत डब्बल इंजिन सरकार येणार

आम आदमी पक्षाने जुनी आश्वासने देत सत्ता मिळवली. पण, सत्तेची मागील १० वर्षे आपने वाया घातली आहेत.दिल्लीतील कारखाने बंद झाले.त्यांनी जनतेला अक्षरशः लुटले. म्हणून जनता ‘आप’ला वैतागली आहे. येथील मतदार आता भाजपच्या हाती सत्ता देण्यास उत्सुक आहे. दिल्लीत ‘डब्बल इंजिन’ सरकार सत्तेत येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe