ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करणार का : आ. हेमंत ओगले यांचा जिल्हा नियोजनाच्या बैठकीत उद्धिन सवाल !

Sushant Kulkarni
Published:

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या ४० ते ५० वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे नावाखाली त्यांचे संसार उघड्यावर आणले. ज्या तत्परतेने अतिक्रमण कारवाई केली तेवढ्याच तत्पर्तने पुनर्वसन करणार का ? असा उद्धिन सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ. ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. प्रामुख्याने सध्या श्रीरामपूर शहरात चालू असलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत लक्ष वेधले अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या रोजी रोटी वर हातोडा मारल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे, शासनाने केलेल्या कारवाईमुळे श्रीरामपूरात शांतता असून व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आ. ओगले म्हणाले.

तसेच श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळे अजून का बसले नाहीत, त्याचबरोबर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर असून त्याकरिता अतिरिक्त पिंजऱ्यांची गरज आहे.

सौर कृषी पंपासाठी महावितरण शेतकऱ्यांना रेड झोन मध्ये गाव असल्यास भूजल सर्वे क्षण विभागाचा ना हरकत दाखला मागत असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे तरी याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी आ. ओगले यांनी केली.

श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालय हे अतिशय चांगल्या रीतीने कार्यरत असून स्वच्छता त्याचबरोबर रुग्णांची सेवा याकरिता यापूर्वी अनेक पुरस्कार रुग्णालयाला प्राप्त झाले असून सदर रुग्णालयाला प्रोत्साहन पुरस्कार द्यावा अशी मागणी आमदार ओगले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe