Vodafone Idea Share: 9 रुपयाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी… पुढे जबरदस्त वाढ होणार? गुंतवणूकदारांसाठी संधी!

शेअर बाजारात मंगळवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि कंपनीच्या शेअरमध्ये 5% पर्यंतची वाढ नोंदवण्यात आली.

Ratnakar Ashok Patil
Published:

VI Share Price: शेअर बाजारात मंगळवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि कंपनीच्या शेअरमध्ये 5% पर्यंतची वाढ नोंदवण्यात आली. व्होडाफोन आयडिया शेअरने मंगळवारी 9.29 रुपया वर सुरुवात केली आणि 9.61 रुपयांपर्यंत पोहोचला. सकाळी 11 वाजता 3.31% वाढीसह 9.37 वर ट्रेड करत होता.

व्होडाफोन आयडियाचा थकीत कर्जभार

व्होडाफोन आयडियावर सध्या सुमारे 80,000 कोटींची एजीआर थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी कंपनीच्या शेअरने 10% पर्यंतची उसळी घेतली होती.

मात्र सोमवारी तो फक्त 7% वाढला. सध्याची शेअर किंमत 9.08 रुपये असून ही 2024 मधील उच्चांक 19.18 रुपयेपेक्षा कमी आहे आणि एफपीओ (Follow-on Public Offer) किंमत 11 रुपयाच्या तुलनेत 50% खाली आहे.

118 रुपयांवरून 3 रुपयांपर्यंत घसरलेला शेअर

एकेकाळी 118.95 रुपयांवर पोहोचलेला हा शेअर आता फक्त 9-10 रुपयाच्या दरम्यान चढ-उतार करत आहे. एप्रिल 2015 मध्ये हा शेअर उच्चांकी स्तरावर होता.मात्र मार्च 2020 पर्यंत तो फक्त 3 रुपयापर्यंत खाली आला. नंतर काहीशी सुधारणा होऊन तो 19.18 रुपयांवर गेला.

गेल्या 5 वर्षांतील परफॉर्मन्स आणि जोखीम

गेल्या 5 वर्षांत या शेअरने 77% परतावा दिला आहे. मात्र गेल्या वर्षभरात 32% घसरण झाली आहे.52 आठवड्यांचा नीचांकी स्तर: 6.61 रुपये इतका आहे.

एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांचे वक्तव्य

वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांनी स्पष्ट केले की, अद्याप थकीत समायोजित सकल महसुलावर (AGR) अंतिम निर्णय झाला नाही. याचा अर्थ सरकार याबाबत विचार करत आहे.

मात्र कोणताही ठोस निर्णय अजून झालेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या चर्चेदरम्यानही या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

व्होडाफोन आयडियाच्या आर्थिक स्थितीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मोठ्या थकीत कर्जामुळे ही कंपनी सध्या आव्हानात्मक परिस्थितीत आहे. शेअरमध्ये थोडीफार तेजी दिसत असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर सध्या कितपत योग्य आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe