3.5 वर्षाचा वेटिंग पिरियड! Maruti च्या ‘या’ कारने बाजारात घातला धुमाकूळ

जिमनी नोमॅडच्या वाढत्या मागणीमुळे वेटिंग पीरियड 3.5 वर्षांपर्यंत पोहचला असून मारुती सुझुकीच्या 5-डोअर जिमनी नोमॅड मॉडेलला जपानमध्ये प्रचंड मागणी आहे. काहीच दिवसांत जपानमध्ये या कारचे बुकिंग 50,000 युनिट्सपर्यंत पोहोचले आहे.ज्यामुळे वेटिंग पीरियड 41 महिने म्हणजेच 3.5 वर्षे झाला आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Maruti Jimny Nomad:- जिमनी नोमॅडच्या वाढत्या मागणीमुळे वेटिंग पीरियड 3.5 वर्षांपर्यंत पोहचला असून
मारुती सुझुकीच्या 5-डोअर जिमनी नोमॅड मॉडेलला जपानमध्ये प्रचंड मागणी आहे. काहीच दिवसांत जपानमध्ये या कारचे बुकिंग 50,000 युनिट्सपर्यंत पोहोचले आहे.ज्यामुळे वेटिंग पीरियड 41 महिने म्हणजेच 3.5 वर्षे झाला आहे. यामुळे मारुतीने बुकिंग तात्पुरते बंद केले आहे आणि जपानमध्ये एसयूव्हीचे प्रमोशनल प्रोग्रॅम देखील कॅन्सल केले आहेत.

मारुतीच्या गुरुग्राम प्लांटमधून जिमनी नोमॅडचे उत्पादन

जिमनी नोमॅडचे उत्पादन फक्त मारुतीच्या गुरुग्राम स्थित प्लांटमध्ये होत आहे. सध्या जपानसाठी या कारचे उत्पादन दरमहा 1200 युनिट्सवर मर्यादित आहे. जिमनी नोमॅडची वाढती मागणी पाहता सुझुकी कंपनी आपल्या उत्पादन क्षमतेला वाढवू शकते.ज्यामुळे अधिक युनिट्स तयार करणे शक्य होईल.

जपानमधील डिलिव्हरी 3 एप्रिलपासून

जपानमध्ये जिमनी नोमॅडची डिलिव्हरी 3 एप्रिलपासून सुरू होईल. भारतातून जपानला जिमनी नोमॅडच्या युनिट्सची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. हे युनिट्स जपानमधील सुझुकी डीलरशिपमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जिमनी नोमॅडच्या किंमती आणि व्हेरिएंट्स

जपानमध्ये जिमनी नोमॅडच्या 5-स्पीड मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 2,651,000 येन (सुमारे 14.88 लाख) पासून सुरू होते. याशिवाय 4AT व्हेरिएंटची किंमत 2,750,000 येन (सुमारे 15.43 लाख) आहे. जपानमध्ये या कारचे उच्च मागणीमुळे किंमतीत वृद्धी होण्याची शक्यता आहे.

मारुतीच्या इतर एक्स्पोर्ट केलेल्या गाड्यांमध्ये फ्रॉन्क्स आणि बलेनोचा समावेश

मारुती सुझुकीने भारताच्या बाहेर बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून त्याच्या गाड्यांची निर्यात वाढवली आहे. भारतातून सर्वाधिक एक्स्पोर्ट होणाऱ्या गाड्यांमध्ये मारुती फ्रॉन्क्स, डिझायर, बलेनो, स्विफ्ट, एर्टिगा,

सेलेरियो आणि इको यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे.

जिमनी 5-डोअर मॉडेलच्या भारतीय बाजारपेठेत कमी विक्री

जिमनी 5-डोअर मॉडेल सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वात कमी विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. तथापि त्याच्या परदेशी बाजारातील यशामुळे कंपनीला या मॉडेलच्या उत्पादनास अधिक प्रमाणात स्थिरता मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe