महिन्याला 50 हजार पगार असणाऱ्यांना किती ग्रॅच्युईटी मिळणार ? पहा सविस्तर

किमान पाच वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत असतो. पण यासाठी संबंधित कंपनी ही ग्रॅच्युईटीच्या कायद्यात बसणे आवश्यक आहे. ज्या कंपन्या या कायद्यात येत नाहीत त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.

Tejas B Shelar
Published:

Gratuity Money Rule 2025 : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटीचा लाभ मिळत असतो. कर्मचाऱ्यांनी एखाद्या कंपनीत केलेल्या कामासाठी कंपनीकडून बक्षीस म्हणून ग्रॅच्युईटीचा लाभ दिला जात असतो. मात्र सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही.

किमान पाच वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत असतो. पण यासाठी संबंधित कंपनी ही ग्रॅच्युईटीच्या कायद्यात बसणे आवश्यक आहे. ज्या कंपन्या या कायद्यात येत नाहीत त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.

पण जी कंपनी या कायद्यात बसली नाही ती कंपनी स्वतः आपल्या इच्छेने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देत असते. पण, अशा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नेमकी किती ग्रॅच्युइटी मिळणार? हे ठरवले जात नाही, कंपन्या त्यांना हवी तेवढी रक्कम त्यांच्या कर्मचाऱ्यांना देऊ शकतात.

दरम्यान आज आपण ग्रॅच्यूटीच्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात नेमकी किती ग्रॅच्यूटी मिळणार? यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो? याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ग्रॅच्युईटीची रक्कम मोजण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो?

ग्रॅच्युईटीची रक्कम मोजण्यासाठी ग्रॅच्युईटी कायदा 1972 मध्ये एक फॉर्मुला देण्यात आला आहे. याअंतर्गत एका विशिष्ट सूत्राच्या माध्यमातून ग्रॅच्युईटीची रक्कम मोजली जाते. (कर्मचाऱ्याचे मूळ वेतन x नोकरीचा कालावधी x 15/26) हा ग्रॅच्युईटीची रक्कम मोजण्याचा फॉर्मुला आहे.

या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुम्हाला किती ग्रॅच्युएटी रक्कम मिळणार हे चेक करू शकता. आता आपण 50 हजार पगार असणाऱ्यांना किती ग्रॅच्युइटी मिळणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

50 हजार पगार असणाऱ्यांना किती ग्रॅच्युईटी मिळणार?

मंडळी, अनेकांकडून त्यांच्या पगारानुसार त्यांना किती Gratuity मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातो. दरम्यान, आज आपण कर्मचाऱ्याने एकूण 10 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजेच कंपनीमध्ये काम केले असेल आणि त्याचा मासिक बेसिक पगार 50,000 रुपये असेल तर, सूत्राप्रमाणे 50,000 x 10 वर्षे x (15/26) = 2 लाख 88 हजार 461 म्हणजेच निवृत्तीनंतर संबंधित पगारदार व्यक्तीला 2 लाख 88 हजार 461 रुपयांची ग्रॅच्युईटी मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe