25 हजार पगार असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार ? संपूर्ण गणित पहा….

ईपीएफओ पेन्शन ही कर्मचाऱ्याला वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर मिळतात. यासाठी नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम एपीएफमध्ये जमा होते. जेवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होते तेवढीच रक्कम कंपनीकडूनही ईपीएफमध्ये जमा होत असते.

Updated on -

EPFO Pension Money : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी खाजगी क्षेत्रात कार्यरत असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचायला हवी. मंडळी, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार पेन्शनचा लाभ दिला जात असतो.

EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळते. पण ज्या लोकांचा पगार 25 हजार रुपये आहे त्यांना किती पेन्शन मिळते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का. नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

खरे तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ईपीएफओ द्वारे ईपीएस पेन्शन दिली जाते. ईपीएस मासिक पेन्शन एका ठराविक फॉर्मुल्यानुसार ठरवली जात असते.

EPFO पेन्शनचे नियम

ईपीएफओ पेन्शन ही कर्मचाऱ्याला वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर मिळतात. यासाठी नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम एपीएफमध्ये जमा होते. जेवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होते तेवढीच रक्कम कंपनीकडूनही ईपीएफमध्ये जमा होत असते.

एखाद्या कर्मचाऱ्याने सलग दहा वर्ष काम केलेले असेल तर तो पेन्शन साठी पात्र ठरतो. म्हणजे किमान दहा वर्ष नोकरी केलेली असेल तर कर्मचारी ईपीएस पेन्शन साठी पात्र ठरतात.

कर्मचाऱ्यांकडून पेन्शन साठी त्याच्या पगाराच्या 12 टक्के एवढी रक्कम आणि कंपनीकडून देखील तेवढीच रक्कम योगदान म्हणून ईपीएफ मध्ये जमा होते. कंपनीकडून जे योगदान दिले जाते त्यापैकी 8.33% ईपीएस म्हणजेच पेन्शन साठी आणि उर्वरित 3.67% ईपीएफ मध्ये जमा केले जाते.

EPS पेन्शनचा फॉर्म्युला काय आहे

EPS पेन्शनसाठी (सरासरी पगार × नोकरीचा कालावधी/70) हा फॉर्म्युला वापरला जातो. यामध्ये सरासरी पगार म्हणजे त्या कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच वर्षांमधील पगाराची सरासरी. आता आपण 25000 पगार असल्यास किती पेन्शन मिळणारे समजून घेऊयात.

25 हजार पगारवाल्याला किती पेन्शन?

जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पेन्शन पात्र सरासरी पगार 25 हजार रुपये अन त्याने दहा वर्ष काम केले आहे तर अशा परिस्थितीत EPS च्या फॉर्मुल्यानुसार त्याला किती पेन्शन मिळणार हे पाहुयात. फॉर्मुल्यानुसार सदर कर्मचाऱ्याला 25000×10/70 = 3571 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे.

म्हणजे जर एखाद्याचा पाच वर्षांचा सरासरी पगार 25 हजार रुपये असेल आणि त्याने दहा वर्षे काम केले असेल तर अशा परिस्थितीत सदर व्यक्तीला 3571 रुपये ईपीएस अंतर्गत मासिक पेन्शन मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News