50 हजार रुपये महिना कमाई करणाऱ्याला SBI किती लाखांचे Home Loan देणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बॅंकां असून यामध्ये एसबीआय चा समावेश होतो. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज देते. गृह कर्जासाठी या बँकेचे व्याजदर फारच आकर्षक आहेत.

Tejas B Shelar
Published:

SBI Home Loan Details : जर तुम्हाला 50 हजार रुपये महिना पगार असेल अन तुम्ही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता जे लोक एसबीआय कडून होम लोन घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरणार आहे.

कारण की आज आपण एसबीआयच्या होम लोन ची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या लोकांना एसबीआय कडून किती होम लोन मिळते याचाच आज आपण आढावा घेणार आहोत.

SBI च्या गृह कर्जाची माहिती

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बॅंकां असून यामध्ये एसबीआय चा समावेश होतो. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज देते.

गृह कर्जासाठी या बँकेचे व्याजदर फारच आकर्षक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% व्याजदरात गृह कर्ज देत आहे. मात्र या आकर्षक व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होतो.

किमान साडेसातशे ते 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना या बँकेच्या किमान आणि आकर्षक व्याजदरात होम लोन मिळते अशी माहिती दिली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना कमाल 30 वर्ष कालावधीसाठी गृह कर्ज देत आहे. नक्कीच कर्ज परतफेडीसाठी अधिकचा कालावधी मिळाला तर ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

किती Home Loan मिळणार?

रिपोर्टनुसार, ज्या लोकांना 50000 पेक्षा अधिक पगार आहे, ज्या लोकांना 51 हजार रुपये महिन्याचा पगार आहे अशा लोकांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तीस लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज मंजूर होऊ शकते. अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असेल तर त्याला 8.50% दरातच हे कर्ज मंजूर होईल.

मात्र यासाठी अशा व्यक्तीवर आधीच कर्ज नसावे. जर एखाद्या व्यक्तीवर आधीच कर्ज असेल तर त्याला 50000 पगार असला तरी सुद्धा 30 लाख रुपये मिळणार नाहीत. अर्थातच ज्या लोकांना तीस लाख रुपये गृह कर्ज हवे असेल त्या पगारदार लोकांना किमान 51 हजार रुपयांचा पगार असणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe