गुंतवणूकदारांसाठी गुड न्युज ! Post Office ची ‘ही’ योजना देणार 2 लाख 54 हजार 272 रुपयांचे व्याज, पहा….

एखाद्या वेळी बँकेच्या एफडी योजनांमधील पैसे बुडू शकतात मात्र पोस्टाच्या बचत योजनेचे पैसे बुडणे अशक्य आहे. बँक बुडाली की एफडी मधील पैसे सुद्धा बुडतात, जर बुडणाऱ्या बँकेत ग्राहकांचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिकचे पैसे असतील तर ते पैसे बूडतात.

Tejas B Shelar
Published:

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका भन्नाट बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच लाखों रुपयांचा परतावा मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही बचत योजना पूर्णपणे सुरक्षित असून यामध्ये गुंतवलेले ग्राहकांचे पैसे बुडणार नाहीत. सरकार स्वतः या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर हमी देते. हेच कारण आहे की पोस्टाच्या बचत योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.

एखाद्या वेळी बँकेच्या एफडी योजनांमधील पैसे बुडू शकतात मात्र पोस्टाच्या बचत योजनेचे पैसे बुडणे अशक्य आहे. बँक बुडाली की एफडी मधील पैसे सुद्धा बुडतात, जर बुडणाऱ्या बँकेत ग्राहकांचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिकचे पैसे असतील तर ते पैसे बूडतात.

परंतु पोस्टाच्या बचत योजनेच्या बाबतीत असे घडत नाही. म्हणूनच आज आपण पोस्टाच्या अशा एका विशेष बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे.

ही आहे Post Office ची जबरदस्त योजना

आज आपण ज्या पोस्ट ऑफिसच्या विशेष बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्याला ‘पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट’ असं म्हणतात. या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत लोन सुद्धा मिळते. म्हणजे योजनेत पैसे लावलेत आणि अचानक पैशांची गरज भासली तर तुम्हाला यावर कर्ज सुद्धा मिळणार आहे.

पोस्टाच्या या योजनेतून गुंतवणूकदारांना तब्बल अडीच लाखाहून अधिक चे व्याज मिळणार आहे. दरम्यान आज आपण पोस्टाच्या या योजनेतून अडीच लाखाहून अधिकचे व्याज मिळवण्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे? या योजनेसाठी सध्या सरकारकडून काय दराने व्याज दिले जात आहे? याचाचं सविस्तर आढावा घेणार आहोत.

कसे आहेत पोस्टाच्या या योजनेचे व्याजदर ?

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचे व्याजदर तिमाही आधारावर कॅल्क्युलेट केले जातात. सध्या या योजनेचे व्याजदर 6.7% आहे. ही योजना पोस्टाच्या स्मॉल सेविंग योजनांपैकी एक आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे एकरकमी पैसा गुंतवावा लागत नाही.

गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकतात. यात आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी पोस्टाच्या आरडीमध्ये आपले खाते उघडून लाखोंच्या घरात परतावा मिळवला आहे.

पोस्टाच्या या योजनेतून कसे मिळणार अडीच लाखांचे व्याज

पोस्टाची आरडी योजना ही पाच वर्षांची आहे. जर तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये पाच वर्षांसाठी प्रति महिना 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षांनी 6.7 टक्के दराने तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये तीन लाख रुपये हे गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित 56 हजार 830 हे त्याला व्याज म्हणून मिळणार आहेत. पण जर तुम्हाला यातून लाखो रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसचे आरडी योजनेचे हे खाते तुम्हाला एक्सटेंड करायचे आहे.

म्हणजेच यातुन अधिकचा लाभ हवा असेल तर यातील गुंतवणूक आणखी पाच वर्षांसाठी वाढवायची आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला दहा वर्षांनी पोस्टाच्या या आरडी योजनेतून आठ लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये सहा लाख रुपये गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित दोन लाख 54 हजार 272 रुपये गुंतवणूकदाराला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe