Good Time Signs:- आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या आणि वाईट वेळ येत असते. काही वेळा अशा संधी येतात जेव्हा एका क्षणातच तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार चांगली वेळ येण्याचे काही खास संकेत असतात.ज्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्या भविष्याचा मार्ग दिसून येईल. हे संकेत तुमचं भविष्य उज्वल करणारे असतात म्हणून त्यांना दुर्लक्ष करू नका.
चांगली वेळ येण्याची शुभ संकेत
गाय घरात येणे
गाय घराच्या दारात येणे हे एक अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. हे दर्शवते की तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. गाय घरी आल्यावर तिचे स्वागत करा आणि तिला भाकरी खायला द्या. यामुळे घरात धन व सुख समृद्धी येते असे मानले जाते.
वाटेत माकड, कुत्रा किंवा साप दिसणे
तुम्ही बाहेर जात असताना जर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर हे एक चांगलं लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा की,तुमच्याकडे लवकरच पैसा येणार आहे. तसेच सकाळी पूजा करताना नारळ पाहिलं तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होणार आहे.
बाल्कनीत चिमणी येऊन बसणे
चिमणी घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत किलबिलाट करत बसलीतर ते तुमच्या जीवनातील दु:ख व त्रास दूर होणार असल्याचं दर्शवते. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येईल आणि तुम्हाला आनंद मिळेल.
घोड्याची नाल मिळणे
वाटेत कोणत्याही दिवशी घोड्याची नाल सापडली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः शनिवार वगळता अन्य दिवसांमध्ये घोड्याची नाल मिळाल्यास ती तुमच्यासोबत ठेवा कारण हे समृद्धीचे लक्षण आहे.
फुलपाखरू दिसणे
फुलपाखरं हे देखील शुभतेचे प्रतीक मानले जाते.रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्या आसपास दिसली तर ते तुमच्यासाठी आनंद व समृद्धी घेऊन येणार आहेत. ते तुमच्या जीवनात चांगली वेळ येण्याचं संकेत असतात.
रुईचे झाड अंगणात वाढणे
घराच्या अंगणात रुईचे झाड वाढणे म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात शुभ घटनांचे आगमन होणार आहे. यामुळे तुमच्या जीवनात चांगली आणि सुखद वेळ येणार आहे.
पाण्याने भरलेले भांडे हातात दिसणे
घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते अत्यंत शुभ मानलं जाते.हे समृद्धी व सुख-समृद्धीचे लक्षण आहे.ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगली वेळ येईल.
या सर्व चिन्हांकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या भविष्याचे योग्य अंदाज घेऊ शकता. जर तुमच्या जीवनात हे संकेत दिसले तर तुमचं जीवन बदलण्यास चांगली वेळ जवळ येत आहे हे समजून चला.