Penny Stock : 8 रुपयाचा स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये तेजी दिसली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्केहुन अधिक वाढीसह क्लोज झाली होती.

Updated on -

Penny Stock : एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात थोडीशी घसरण दिसली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. पण आता भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी आली आहे. काल मंगळवारी भारतीय शहर बाजार वाढीचे बंद झाला आणि आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली.

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये तेजी दिसली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्केहुन अधिक वाढीसह क्लोज झाली होती.

आजही सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये तेजी असून शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान आज आपण अशाच एका पेनिस स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीत 430 % हुन अधिकचा परतावा दिलेला आहे.

कोणता आहे तो स्टॉक

आम्ही ज्या स्टॉक बाबत बोलत आहोत त्या स्टॉक ची किंमत दहा रुपयांपेक्षा कमी आहे. सर्वेश्वर फूड्स असे या स्टॉकच नाव आहे. हा शेअर बुधवारी ८.२० रुपयांवर पोहोचला, तर मंगळवारी हा पेनी स्टॉक ७.८४ रुपयांवर बंद झाला होता.

म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून या स्टॉकमध्ये मोठी वाढ दिसत आहे. पण अजूनही हा स्टॉक १५.७३ रुपयांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ४८ टक्क्यांनी खालीचं आहे. मात्र ७.३४ रुपयांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवरून यात ११ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

तसेच स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉक साठी आपली रेटिंग अपग्रेड केली आहे. यामुळे हा स्टॉक खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढणार अशी आशा विश्लेषकांना असून यामुळे गुंतवणूकदारांनी आता या स्टॉकच्या खरेदीसाठी हालचाली वाढवल्यात असे चित्र दिसत आहे.

या शेअरला इन्फॉर्मेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगकडून क्रेडिट रेटिंग अपग्रेड मिळाले आहे, ज्यामुळे खरेदीदारांच्या हालचाली वाढल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या डिसेंबरमध्ये या कंपनीने अमेरिकेतील आय सिफोल एलएलसीकडून सुमारे ४९८ दशलक्ष रुपये किमतीच्या सुमारे ५,३५० मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात ऑर्डर मिळवली.

हा आदेश सर्वेश्वर फूड्सची वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती आणि सेंद्रिय तांदूळ उत्पादनांची मागणी दर्शवितो. हेच कारण आहे की स्टॉक मार्केट विश्लेषक या स्टॉक साठी सकारात्मक दिसत आहेत. आगामी काळात हा शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकतो असा विश्वास विश्लेषकांनी व्यक्त केलाय.

मात्र गेल्या एका वर्षाचा विचार केला असता या स्टॉक मध्ये सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान सुद्धा झालेले आहे. गेल्या महिनाभरात या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक, 6 महिन्यांच्या कालावधीत 7 टक्क्यांहून अधिक अन एक वर्षात ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पण, लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक फायद्याचा राहिला आहे. पाच वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कालावधीत या स्टॉकने ४३० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. दुसरीकडे, नजीकच्या भविष्यात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना आणखी चांगला परतावा देताना दिसेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News