RBI चा मोठा खुलासा! क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी मोठी अपडेट, त्वरित जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान!

भारतात क्रेडिट कार्ड वापराचा वेग झपाट्याने वाढत असून ग्राहकांचा कल डिजिटल पेमेंट प्रणालीकडे अधिकाधिक दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटमधील वाढीचा ट्रेंड स्पष्टपणे दिसून येतो.

Ratnakar Ashok Patil
Published:

Credit Card Update:- भारतात क्रेडिट कार्ड वापराचा वेग झपाट्याने वाढत असून ग्राहकांचा कल डिजिटल पेमेंट प्रणालीकडे अधिकाधिक दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटमधील वाढीचा ट्रेंड स्पष्टपणे दिसून येतो.

क्रेडिट कार्ड वापराचा नवा उच्चांक

2019 मध्ये जिथे 5.53 कोटी क्रेडिट कार्ड धारक होते. तर 2024 पर्यंत हा आकडा 10.80 कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. याच कालावधीत क्रेडिट कार्ड व्यवहारांचे एकूण मूल्य 20.37 लाख कोटी रुपये नोंदवले गेले.

जे डेबिट कार्डपेक्षा कितीतरी जास्त आहे. तुलनात्मक दृष्ट्या बघितले तर डेबिट कार्डच्या वाढीचा वेग स्थिर राहिला असून डिसेंबर 2024 पर्यंत 99.09 कोटी डेबिट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत.

मात्र डेबिट कार्डद्वारे 173.90 कोटी व्यवहार झाले असून त्यांचे एकूण किंमत 5.16 लाख कोटी रुपये होती.जे क्रेडिट कार्डच्या तुलनेत कमी आहे.

सार्वजनिक आणि खाजगी बँकांची आघाडी

सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्ड जारी केली आहेत

सार्वजनिक बँका
2019 ते 2024 दरम्यान 110% वाढ, एकूण 257.61 लाख क्रेडिट कार्ड जारी केले m

खाजगी बँका
या कालावधीत 766 लाख क्रेडिट कार्ड जारी केले.

परदेशी बँकांची घट

याउलट परदेशी बँकांच्या क्रेडिट कार्डच्या संख्येत घट दिसून आली आहे. 2019 मध्ये जिथे 65.79 लाख क्रेडिट कार्ड्स होती ती 2024 पर्यंत 45.94 लाखांवर आली आहे.

UPI च्या वर्चस्वात वाढ

भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा प्रभाव वाढत चालला आहे. 2024 मध्ये UPI व्यवहारांचा वाटा 83% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे,.जो 2019 मध्ये केवळ 34% होता. तुलनेत RTGS, NEFT, IMPS, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहारांचा वाटा 66% वरून 17% पर्यंत घसरला आहे.

UPI व्यवहारांचा झपाट्याने वाढता वेग

2018 मध्ये UPI व्यवहार 3.75 अब्ज रुपये इतके होते. जे 2024 मध्ये 17,221 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे, UPI व्यवहारांचे एकूण मूल्य 5.86 लाख कोटींवरून 246.83 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

होणाऱ्या बदलांबाबत सतर्क रहा

क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढतोय. UPI ही सर्वात मोठी पेमेंट प्रणाली बनत आहे, जी भविष्यात अजून प्रभावी ठरणार आहे.परदेशी बँकांच्या क्रेडिट कार्डमध्ये घट तर भारतीय बँकांनी मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड जारी केली आहेत.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डिजिटल पेमेंटचा वापर करत असाल तर या बदलांबाबत सतर्क राहा. कारण भविष्यातील ट्रेंड लक्षात घेता UPI आणि क्रेडिट कार्ड वापर अधिक प्रमाणात होणार आहे.त्यामुळे स्मार्ट आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe