श्रीगोंदा हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून, हे सरकार हिंदूंच्या ताकदीमुळे स्थापन झालेले आहे. या सरकारच्या काळात हिंदूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो असून, येथील जिहादी मानसिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला येथील ससाणेनगरमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी दलित हिंदू कुटुंबांच्या समर्थनार्थ मंत्री नितेश राणे यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली, या वेळी ते बोलत होते. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक, ससाणेनगर वस्ती, श्रीगोंदा शहर, असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास आ. संग्राम जगताप व आ. विक्रम पाचपुते उपस्थित होते.
ना. राणे यांनी श्रीगोंदा तहसीलदारसमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी ते म्हणाले की, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ससाणेनगर येथे लहान मुले फटाके फोडत असताना किरकोळ कारणावरून जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून दलित हिंदू कुटुंबाच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.
त्यानंतर ज्या काही घटना घडल्या, त्याच्या निषेधार्थ सरकारचा प्रतिनिधी म्हणून हिंदू समाजाला धीर व ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून, हे सरकार हिंदूंच्या ताकदीमुळे स्थापन झालेले आहे. या सरकारच्या काळात हिंदूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही.
सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी येथे उपस्थित आहे. हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वास द्यायचा आहे की, हे सरकार पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे. जो कोण जिहादी कुरेशी मस्ती करतोय, त्याला वाटत आहे हे पाकिस्तान आहे, त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात, पोलीस कशाला म्हणतात, त्यांची दहशत मोडून काढण्याचे काम आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून करणार आहे.
जेणेकरून कुरेशी उठण्याचाही प्रयत्न करणार नाही. जे त्यांचे जिहादी मानसिकतेचे साथीदार श्रीगोंद्यात असतील, त्यांना समजले पाहिजे येथे हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारमधील आमदार आहे. म्हणून त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही. या मोर्चास बहुसंख्य हिंदूबांधव सहभागी झाले होते.