नवीन Tax Slab मुळे तुमच्या उत्पन्नावर किती कर लागेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि कॅल्क्युलेशन

Mahesh Waghmare
Published:

New Tax Slab:- २०२५ च्या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण सुधारणा करदात्यांना कर भरण्याच्या प्रक्रियेत दिलासा देणाऱ्या आहेत. यात मुख्यतः काही नवीन कर स्लॅब्सची अंमलबजावणी केली गेली आहे आणि उत्पन्नावर लागणारा कर कमी करण्यासाठी काही सवलती प्रदान करण्यात आल्या आहेत.

या सुधारणा पगारदार व्यक्तींना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना विशेषतः फायद्याच्या ठरतील. जर आपण १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांबद्दल विचार केला तर त्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. याशिवाय मूळ कर सवलत ३ लाख रुपयांवरून ४ लाख रुपयांवर वाढवण्यात आली आहे. जे २ लाख रुपयांपर्यंत कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मोठा फायदा देईल.

कसा आहे नवीन कर स्लॅब?

नवीन कर स्लॅब्स अंतर्गत, करदारांना काही ठराविक उत्पन्न श्रेणींमध्ये वेगवेगळ्या दरांवर कर भरावा लागतो. या दरांनुसार ० ते ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्याची आवश्यकता नाही.

४ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत ५% कर, ८ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १०% कर, १२ लाख ते १६ लाख रुपयांपर्यंत १५% कर, १६ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत २०% कर, २० लाख ते २४ लाख रुपयांपर्यंत २५% कर आणि २४ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ३०% कर भरावा लागतो. या स्लॅब्सच्या मदतीने करदात्यांसाठी उत्पन्न प्रमाणे योग्य कर आकारणी केली जाते.

१ कोटी पगार असेल तर

आता विचार करूया की, जर तुमचा वार्षिक पगार १ कोटी रुपये असेल तर त्यावर लागणारा कर किती होईल. सर्वप्रथम, तुमच्या पगारावर ७५,००० रुपयांची मानक वजावट केली जाते. या वजावटीनंतर तुमचं करपात्र उत्पन्न ९९,२५,००० रुपये राहते. आता या उत्पन्नावर कराची गणना करताना प्रत्येक कर स्लॅबला अनुसरून कर आकारला जातो.

० ते ४ लाख रुपये: या श्रेणीत कोणताही कर नाही म्हणजेच शून्य रुपये कर लागेल.

४ ते ८ लाख रुपये: या श्रेणीत ५% कर लागतो. ४ लाख ते ८ लाखच्या उत्पन्नावर २०,००० (५%) कर लागू होतो.

८ ते १२ लाख रुपये: या श्रेणीत १०% कर लागतो. ८ लाख ते १२ लाखच्या उत्पन्नावर ४०,००० (१०%) कर लागतो.

१२ ते १६ लाख रुपये: या श्रेणीत १५% कर लागतो. १२ लाख ते १६ लाखच्या उत्पन्नावर ६०,००० (१५%) कर लागतो.

१६ ते २० लाख रुपये: या श्रेणीत २०% कर लागतो. १६ लाख ते २० लाखाच्या उत्पन्नावर ८०,००० (२०%) कर लागतो.

२० ते २४ लाख रुपये: या श्रेणीत २५% कर लागतो. २० लाख ते २४ लाखच्या उत्पन्नावर १,००,००० (२५%) कर लागतो.

२४ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न: या श्रेणीत ३०% कर लागतो. २४ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर २२,५७,५०० (३०%) कर लागतो.

एकूण कराची गणना

वरील सर्व स्लॅब्सनुसार १ कोटी रुपयांच्या पगारावर एकूण कर २५,५७,५०० होईल. यामध्ये प्रत्येक स्लॅबमधून लागणारा कर एका विशिष्ट प्रमाणात घेतला जातो.जो सर्वांच्या उत्पन्नानुसार बदलतो. यावर अतिरिक्त ४% उपकर (Cess) लागू होईल. जो १,०२,३०० होईल. यामुळे एकूण कर २६,५९,८०० होईल.

कर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

सर्वप्रथम मानक वजावट लागू झाल्यानंतर तुम्हाला ९९,२५,००० करपात्र उत्पन्न राहील. त्यानंतर तुम्ही विविध स्लॅब्सनुसार कर भरणे सुरू कराल. प्रत्येक स्लॅबमध्ये कराचे प्रमाण दिले आहे आणि त्यानुसार तुमच्यावर एकूण २५,५७,५०० कर लागेल. यामध्ये ४% उपकर देखील लागेल.त्यामुळे एकूण कर २६,५९,८०० होईल.

कर बचतीसाठी उपाय

तुम्ही या कर रकमेतून काही प्रमाणात बचत करू शकतात.जर तुम्ही कर बचत योजनांचा वापर केला. यात पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), नेशनल पेंशन स्कीम (NPS), ५ वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटस आणि आयुर्विमा योजनांचा समावेश केला जातो. या योजनांचा वापर करून तुम्ही तुमच्या कराची रक्कम कमी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe