SBI Lumpsum Plan:- एसबीआय लम्पसम प्लॅन एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. जी विशेषत: अशा लोकांसाठी चांगली आहे जे दीर्घकालीन गुंतवणुक करून मोठा परतावा मिळवण्याची इच्छा ठेवतात. भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह संस्थांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या या लम्पसम म्युच्युअल फंड योजनेने पारंपारिक एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) गुंतवणुकीला जोरदार स्पर्धा दिली आहे. पारंपारिक एफडीमध्ये गुंतवणूकदारांना सुरक्षेचा फायदा होतो. परंतु त्यावर मिळणारे व्याज सामान्यत: कमी असतात. याउलट एसबीआय लम्पसम प्लॅनमध्ये तुमची गुंतवणूक म्युच्युअल फंड मार्केटमध्ये केली जाते.ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि उच्च परतावा मिळवण्याची संधी निर्माण होते.
एसबीआयच्या योजनेचे फायदे
या योजनेंतर्गत तुम्हाला एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवावी लागते. ज्यामुळे तुमची गुंतवणूक अधिक चांगली वाढू शकते. येथे महिन्याला एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) करायची आवश्यकता नाही. जे एफडीच्या तुलनेत अधिक लवचिकता आणि कमाईचे अधिक पर्याय उपलब्ध करून देते.या योजनेमध्ये किमान ५,००० रुपयांची गुंतवणूक करता येते आणि त्यावर तुमचा परतावा २०% ते ५०% पर्यंत होऊ शकतो. खासकरून तुम्ही ५०,००० हजार गुंतवले आणि ते दीर्घकालावधीसाठी ठेवले तर तुमची गुंतवणूक २० वर्षांमध्ये १८,६६,००० इतकी वाढू शकते. याचा अर्थ एसबीआय लम्पसम प्लॅन एक दीर्घकालीन दृष्टीकोन असलेली एक लाभकारी गुंतवणूक आहे.
यामध्ये गुंतवणुकीची शक्यता खूप आहे. कारण एसबीआयने यापूर्वीही आपल्या योजनेत २५% ते ५०% दराने परतावा दिला आहे. याव्यतिरिक्त एसबीआयच्या विविध म्युच्युअल फंड योजनेतून तुम्ही निवड करू शकता. जसे की,एसबीआय ब्लूचिप फंड, जो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श आहे.एसबीआय स्मॉल कॅप फंड जो उच्च वाढीची क्षमता दर्शवतो, एसबीआय मॅग्नम फंड, जो कमी जोखीम असलेल्या सरकारी बाँडवर आधारित आहे आणि एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड जो संतुलित वाढ आणि संरक्षण प्रदान करतो.
या योजनेचा आणखी महत्त्वाचा फायदा
या योजनेसाठी एक मोठा फायदा म्हणजे ती एफडीपेक्षा जास्त लवचिक आहे आणि इतर बाजारपेठांशी जोडलेली आहे.ज्यामुळे तुम्हाला चांगले परतावा मिळू शकतो त्यामुळे.जोपर्यंत तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयार असाल तेव्हा एसबीआय लम्पसम प्लॅन एक आदर्श पर्याय ठरू शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी एकावेळी जास्त रक्कम आवश्यक आहे. पण त्याचे फायदे दीर्घ कालावधीनंतर नक्कीच दिसून येतात.