Tata Trent Share Price : भारतीय शेअर बाजारात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यात शंकाच नाही. दरम्यान शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आता तिमाही निकाल देखील जाहीर केले जात आहेत.
आज भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या टाटा समूहाच्या टाटा ट्रेंट या कंपनीने देखील आपले तिमाही निकाल जाहीर केले तर आणि या कंपनीचे तिमाही निकाल आऊट झाल्याबरोबर कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. या कंपनीच्या गुंतवणूकदारांकडून या स्टॉकची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू करण्यात आली आहे.
![Tata Trent Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Tata-Trent-Share-Price-1.jpeg)
खरे तर तिमाही निकालात कंपनीचा प्रॉफिट वाढला आहे मात्र असे असतानाही गुंतवणूकदारांकडून हा स्टॉक मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात या कंपनीचा स्टॉक जोरदार आपटला आहे. म्हणूनचं आज आपण हा स्टॉक नेमका का आपटला? कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत याचाच सविस्तर आढावा या ठिकाणी घेणार आहोत.
कसे राहिलेत कंपनीचे तिमाही निकाल?
टाटा समूहाची कंपनी आणि ज्युडिओ पालक ट्रेंट लिमिटेड कंपनीची आज दिवसभर चर्चा पाहायला मिळाली. कारण की आज कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीचा प्रॉफिट वाढला असल्याचे दिसले. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत तिचा नफा सुमारे 34% वाढून 496.54 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 370.64 कोटी रुपये होता.
म्हणजेच कंपनीचा नफा 34 टक्क्यांनी वाढला, त्याच वेळी, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 34.3 टक्क्यांनी वाढून 3,466.62 कोटी रुपयांवरून 4,656.56 कोटी रुपये झाला आहे. मात्र या साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतानाही आजच्या व्यवहारादरम्यान कंपनीचे शेअर्स 8% पेक्षा जास्त घसरले आणि 5259.80 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचलेत. याचे कारण म्हणजे कंपनीचा खर्च हा वाढला आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढून 4,096.08 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, कंपनीने आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 4,715.64 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नोंदवलेल्या 3,546.95 कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ही मजबूत वाढ आहे. कंपनीने सांगितले की, समीक्षाधीन तिमाहीत, तिने 46 शहरांमध्ये 14 वेस्टसाइड आणि 62 ज्युडिओ स्टोअर्स (दुबईतील 1 सह) उघडले आणि 2 वेस्टसाइड आणि 4 ज्युडिओ स्टोअर एकत्र केले.
तिमाहीच्या शेवटी, त्याच्या स्टोअर पोर्टफोलिओमध्ये 238 वेस्टसाइड, 635 ज्युडिओ आणि इतर जीवनशैली संकल्पनांच्या 34 स्टोअर्सचा समावेश होता. कंपनीचे चेअरमन नोएल टाटा म्हणालेत की, आम्ही आमची पोहोच मजबूत करण्यासाठी तसेच आमच्या स्टोअर पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारण्याच्या मार्गावर आहोत. आता आपण कंपनीच्या स्टॉक्सची सध्याची स्थिती समजून घेणार आहोत.
कसे आहेत कंपनीचे स्टॉक ?
ट्रेंट लिमिटेडचा स्टॉक आजच्या व्यवहारादरम्यान 1.4% वाढून रु. 5832.45 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. ट्रेडिंग दरम्यान त्याची इंट्राडेमधील सर्वात कमी किंमत 5583 रुपये होती. या स्टॉकची यंदाची कामगिरी या वर्षात आतापर्यंत काही विशेष राहिलेली नाही.
या वर्षी, सुमारे 28 ट्रेडिंग दिवसांमध्ये 20% पर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, गेल्या वर्षी याने मल्टीबॅगर परतावा दिला. सध्याच्या किंमतीनुसार, एका वर्षात त्याचा परतावा फक्त 87% आहे. पाच वर्षांत यात 800% पर्यंत वाढ झाली आहे. येथे, जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सनुसार या स्टॉकमध्ये 40% वाढ अपेक्षित आहे.
त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 8,345.85 रुपये आहे. याचा अर्थ सध्या हा शेअर इंट्राडे कमी किमतीपासून 33% खाली आहे. त्याची 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 2,956.85 रुपये आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 2,02,537 कोटी रुपये इतके आहे.