Mutual Fund SIP : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून वाढत्या महागाईच्या काळात आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक देखील केली जात आहे. दरम्यान जर तुम्हीही तुमच्याकडील पैसा कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे, आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून ओळखला जातो. म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम एस आय पी च्या माध्यमातून गुंतवून गुंतवणूकदार एक मोठा फंड तयार करू शकतो आणि आपले तसेच आपल्या परिवाराचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते.
![Mutual Fund SIP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mutual-Fund-SIP-2.jpeg)
एकाचवेळी म्हणजे लम्सम पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि दरमहा एक ठराविक रक्कम म्हणजेच एसआयपी द्वारे गुंतवणूक करता येते. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंडमध्ये सहा हजार रुपयांची एसआयपी केल्यास गुंतवणूकदार किती कालावधीत एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकतात याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
किती वर्षात तयार होणार एक कोटीचा फंड
म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही नक्कीच जोखीम पूर्ण आहे. मात्र जेवढी रिस्क शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यात आहे तेवढी यामध्ये नाही. यामुळे अनेक ज्यांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही ते सुद्धा लोक यामध्ये गुंतवणूक करतात आणि चांगला परतावा सुद्धा मिळवत आहेत.
म्युच्युअल फंड मधून सरासरी 12 टक्के दराने गुंतवणूकदारांना परतावा मिळताना दिसतोय. हा एक अंदाज आहे गुंतवणूकदारांना यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त सुद्धा परतावा मिळू शकतो. काही म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांनी 12% पेक्षा अधिकचा परतावा मिळवला आहे.
काही गुंतवणूकदारांना यातून 20% दराने सुद्धा परतावा मिळाला आहे तर काहींना 12 टक्क्यांपेक्षा कमी दराने सुद्धा परतावा मिळालेला आहे. दरम्यान जर म्युच्युअल फंड मधून 12 टक्के दराने गुंतवणूकदारांना परतावा मिळाला तर एक कोटी रुपयांचा फंड किती वर्षांनी तयार होणार याच कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊया.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात 6000 रुपयांची एसआयपी केली आणि त्याने सलग 24 वर्ष गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला एक कोटी रुपयांचा फंड मिळणार आहे. दहा हजार रुपयांची एसआयपी केल्यास 24 वर्षांनी गुंतवणूकदारांना एक कोटी 36 हजार 123 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 17 लाख 28 हजार रुपये इतकी राहणार आहे आणि उर्वरित 83 लाख 8123 रुपये हे त्याला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे सहा हजाराची गुंतवणूक केल्यास 24 वर्षांनी एसआयपी मधून करोडपती होता येत.