Ratan Tata Will : भारतातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या साधी राहणीमानासाठी अन उच्च विचारसरणीसाठी प्रसिद्ध होते. हयात असतांना ते नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिलेत. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी समाजकार्यासाठी करोडोंची संपत्ती राखीव ठेवली आहे. खरे तर सध्या रतन टाटा यांच्या मृत्युपत्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्युपत्राचे सध्या वाचन सुरू असून यातून असे काही समोर येत आहे ज्यावर अनेकांचा विश्वास सुद्धा बसत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात एका व्यक्तीला पाचशे कोटी रुपये देण्यास सांगितले गेले आहे, विशेष बाब अशी की ही व्यक्ती रतन टाटा यांच्या कुटुंबातील नाही.
दिवंगत रतन टाटा हयात असेपर्यंत टाटा यांच्यासोबत सार्वजनिक रूपात ही व्यक्ती तितकीशी चर्चेत सुद्धा राहिली नव्हती. अशा परिस्थितीत या व्यक्तीला तब्बल 500 कोटी रुपये दिले जावेत असे रतन टाटा यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले असल्याने अनेकांना याचा मोठा धक्का बसला आहे.
अन यामुळे सध्या सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रतन टाटा यांचे मृत्युपत्र एक आदर्श मृत्युपत्र आहे अन यात असं नमूद केलं असल्याने उद्योगजगतात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. टाटा यांच्या मृत्युपत्रातील ही गोष्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान आज आपण रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात ज्या व्यक्तीला 500 कोटी रुपयांची संपत्ती दिली जावी असे नमूद करण्यात आले आहे ती अनोळखी व्यक्ती नेमकी कोण आहे? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळाले 500 कोटींचे घबाड?
मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात जमशेदपूर येथील ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजिका मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटी रुपये देण्याचे नमूद करण्यात आले आहे. दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅव्हल एजन्सी स्टॅलियनमध्ये मालकी होती.
2013 मध्ये ही एजन्सी ताज ग्रुप ऑफ होटल्सच्या ताज सर्व्हिसेज मध्ये विलीन करण्यात आली होती. मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे स्टॅलियनमध्ये 80% वाटा होता. तर उर्वरीत हिस्सा हा टाटा समूहाकडे होता.
मोहिनी यांनी थॉमस कुकची सहकारी कंपनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेजचे संचालक म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. दत्ता या दीर्घकाळापासून रतन टाटा यांच्या सहकारी होत्या, त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते. म्हणूनच टाटा यांनी दत्ता यांना 500 कोटी रुपये देण्याचे आपल्या मृत्युपत्रात नमूद केले असावे. पण याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दत्ता यांनी देखील या संदर्भात कोणतीच माहिती आणि प्रतिक्रिया दिलेली नाही. मृत्युपत्राचे वाचन करणारे कार्यकारी अधिकारी आणि रतन टाटा यांची चुलत बहिणी शिरीन आणि डीना जेजीभाय यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. डेरियस खंबाट यांनी सुद्धा कोणतीची टिप्पणी केली नाही.
अधिकारी मेहली मिस्त्री यांनी सुद्धा याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. यामुळे खरच दत्ता यांना 500 कोटी रुपये देण्याचे टाटा यांच्या मृत्युपत्रात म्हटले गेले आहे का? सध्या माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्या खऱ्या आहेत का? याबाबत जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.