Post Office च्या ‘या’ योजनेतून फक्त व्याज म्हणून 31 लाख रुपये मिळणार, गुंतवणूक फक्त एका लाखाची, वाचा….

फक्त पोस्ट ऑफिसच नाही तर बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते ओपन करता येते. ही एक सरकारी योजना असून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते ओपन केले जाते.

Published on -

Post Office Scheme : जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच 31 लाख रुपयाहून अधिकचा लाभ मिळणार आहे.

कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण पोस्टाच्या या योजनेतून फक्त व्याज म्हणून गुंतवणूकदारांना 31 लाख रुपये मिळतात. मित्रांनो आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना. ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे फक्त पोस्ट ऑफिसच नाही तर बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते ओपन करता येते. ही एक सरकारी योजना असून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते ओपन केले जाते.

या योजनेचे खाते हे मुलीचे वय 21 वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर मॅच्युअर होते. या योजनेतल्या गुंतवणुकीवर सध्या स्थितीला 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. आता आपण सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर किती रक्कम मिळणार याचाच एक आढावा घेणार आहोत.

कसे मिळणार 31 लाखांच व्याज?

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि कमीत कमी 250 रुपये गुंतवता येतात. या योजनेत पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. या योजनेचे अकाउंट हे 21 वर्षांनी मॅच्युअर होते.

आता जर समजा पोस्टाच्या या योजनेत दरवर्षी एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर 21 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर 46 लाख 18 हजार 385 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम ही फक्त पंधरा लाख रुपये इतके असेल आणि उर्वरित रक्कम ही व्याजाची असेल. अर्थातच 31 लाख 18 हजार 385 रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळणार आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेच्या काही विशेषता

ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. यामध्ये गुंतवलेले पैसे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकेच्या एवढी मधील पैसे बुडू शकतात मात्र यातील पैसे बुडणे अशक्य आहे. या योजनेत तुम्हाला फिक्स्ड आणि गॅरंटीड रिटर्न मिळतो.

खरंतर मुलीच्या नावानं उघडलेलं खातं २१ वर्षांनंतर मॅच्युअर होतं, मात्र जेव्हा तुमची मुलगी १८ वर्षांची होईल आणि तुम्हाला तिचं लग्न करायचं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही अकाउंट बंदही करू शकता अन यातील पैसे काढू शकता.

याशिवाय आणखी काही वेगळ कारण असेल तर ५ वर्षांनंतर खाते बंद केले जाऊ शकते. लक्षात ठेवा खातं उघडल्याच्या तारखेपासून ५ वर्षानंतरच खातं बंद केलं जाऊ शकतं. पाच वर्षाच्या आत या योजनेचे खाते बंद होऊ शकत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींची खाती उघडता येतात. मात्र, ज्या कुटुंबात जुळ्या मुली आहेत, अशा कुटुंबांमध्येही २ पेक्षा जास्त खाती उघडता येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News