Neem Karoli Baba: तुम्ही कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही? नीम करोली बाबा सांगतात या मागचं खरं कारण!

नीम करोली बाबा हे भारतातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु होते.त्यांनी आपल्या शिकवणींमधून लोकांना भक्ती, सेवा आणि ध्यान याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या अनुयायांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती होत्या, ज्यांनी त्यांच्या विचारांमुळे आपले जीवन बदलले.

Ratnakar Ashok Patil
Published:

Motivational Thought:- नीम करोली बाबा हे भारतातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु होते.त्यांनी आपल्या शिकवणींमधून लोकांना भक्ती, सेवा आणि ध्यान याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या अनुयायांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती होत्या, ज्यांनी त्यांच्या विचारांमुळे आपले जीवन बदलले.

अनेक लोक त्यांना हनुमानजींचा अवतार मानतात आणि असे सांगतात की बाबांकडे चमत्कारिक शक्ती होत्या. मात्र त्यांच्या शिकवणींमध्ये असे अनेक मौल्यवान जीवनसूत्र होते जे आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. बाबांच्या मते, काही विशिष्ट सवयी आणि स्वभावामुळे माणूस आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. अशा सवयी कोणत्या आहेत.त्या समजून घेऊया.

यशस्वी होण्याच्या सवयी

रागावर नियंत्रण ठेवणे

बाबा म्हणत कि माणसाने रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो माणूस वारंवार रागावतो तो आपले मोठे नुकसान करून घेतो. रागामुळे आधी मिळवलेले यशही हळूहळू नष्ट होऊ लागते आणि भविष्यातील संधी देखील हातातून निसटतात.

अनेकदा रागाच्या भरात घेतलेले चुकीचे निर्णय संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतात. म्हणूनच संतांनी नेहमीच संयम आणि शांत स्वभाव बाळगण्याचा सल्ला दिला आहे. रागीट स्वभावामुळे माणूस चुकलेली पावले उचलतो आणि त्याचे दुष्परिणाम पुढे त्याला भोगावे लागतात.

मनावर ताबा ठेवणे

नीम करोली बाबा असेही म्हणत की,मनावर ताबा ठेवणे हे यशाचे गुपित आहे. जो माणूस आपल्या मनावर ताबा मिळवतो तो आपल्या ध्येयावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकतो. मात्र जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याला प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा व्यक्तींचे मन नेहमीच चंचल राहते आणि त्यामुळे त्यांना मोठे निर्णय घेताना अडचणी येतात. मानसिक स्थिरता आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.

स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणे

बाबांच्या मते, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो माणूस नेहमी इतरांवर अवलंबून असतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. अशा लोकांना स्वतः विचार करून निर्णय घेण्याची सवय लावली पाहिजे.

इतरांच्या मतांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणे होय. जो माणूस स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो आणि जीवनात यशस्वी होतो.

कमकुवत मानसिकता

याशिवाय, नीम करोली बाबा असेही सांगत कि कमकुवत मानसिकता असलेले लोक कधीही मोठे यश मिळवू शकत नाहीत. मानसिकरित्या कमकुवत असलेल्या लोकांना नेहमीच इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळे त्यांना संधी मिळूनही ते त्या संधींचा फायदा घेऊ शकत नाहीत.

कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास टिकवणे हे जीवनातील सर्वात मोठे आव्हान असते. ज्या लोकांचा आत्मविश्वास कमी असतो ते मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास घाबरतात आणि त्यामुळे ते कायम मागे राहतात.

अस्वस्थ आणि अस्थिर मन

अंतिम महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिर आणि अस्वस्थ मनाचा माणूस जीवनात मोठे निर्णय घेऊ शकत नाही. नीम करोली बाबा असे सांगत की, जो माणूस नेहमी अस्वस्थ आणि अस्थिर असतो तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा लोकांचे मन नेहमीच गोंधळलेले असते आणि त्यामुळे ते संधींचा फायदा घेऊ शकत नाहीत.

अस्थिर मन माणसाला आपल्या ध्येयापासून दूर नेतं आणि त्यामुळे तो यशाच्या मार्गावर जाताना अनेक अडथळ्यांना सामोरे जाते.मन स्थिर आणि शांत असेल तर कोणतीही परिस्थिती सहज हाताळता येते आणि यश लवकर मिळते.

नीम करोली बाबांच्या शिकवणींमध्ये जीवनाचे खरे तत्त्वज्ञान आहे. जर कोणी या सवयी सुधारल्या आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात लागू केले तर तो निश्चितपणे यशाच्या मार्गावर जाऊ शकतो. संयम, आत्मसंयम, आत्मविश्वास आणि मनाची स्थिरता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे असे बाबा सांगत असत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe