फ्लिपकार्टवर मिळवा भारी डील! Google Pixel 9 स्वस्तात खरेदी करा आणि भन्नाट अनुभव मिळवा

फ्लिपकार्टवर सध्या गुगल पिक्सेल 9 स्मार्टफोनवर एक आकर्षक डील उपलब्ध आहे.ज्यामुळे स्मार्टफोनच्या खरेदीवर 9000 रुपयांची मोठी सवलत मिळत आहे. या सवलतींमुळे तुम्हाला पिक्सेल 9 अधिक किफायतशीर किमतीत मिळू शकतो. गुगल पिक्सेल ९ हा सुरुवातीला भारतात 70999 रुपयांच्या किमतीत लाँच झाला होता.

Ratnakar Ashok Patil
Published:

Google Pixel 9 Smartphone:- फ्लिपकार्टवर सध्या गुगल पिक्सेल 9 स्मार्टफोनवर एक आकर्षक डील उपलब्ध आहे.ज्यामुळे स्मार्टफोनच्या खरेदीवर 9000 रुपयांची मोठी सवलत मिळत आहे. या सवलतींमुळे तुम्हाला पिक्सेल 9 अधिक किफायतशीर किमतीत मिळू शकतो. गुगल पिक्सेल ९ हा सुरुवातीला भारतात 70999 रुपयांच्या किमतीत लाँच झाला होता.

तथापि फ्लिपकार्टवर आता 5000 रुपयांची थेट सवलत मिळत असून स्मार्टफोनची किमत 74999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. यावर अतिरिक्त बचत करण्यासाठी, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 4000 रुपयांची सवलत मिळवता येते. याशिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करुन आणखी सवलत मिळवू शकता.जेणेकरून पिक्सेल 9 वर खर्च कमी होईल.

काय खास आहे या स्मार्टफोनमध्ये?

गुगल पिक्सेल 9 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.जे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक आकर्षक अनुभव निर्माण करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे.जो 1080 x 2424 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो.

या डिस्प्लेमध्ये 2700 निट्स पीक ब्राइटनेस, एचडीआर सपोर्ट आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे.ज्यामुळे स्क्रीन खूपच गुळगुळीत आणि स्पष्ट दिसते. गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 च्या संरक्षणामुळे डिस्प्ले अधिक टिकाऊ आहे आणि त्यावर खूप जास्त घासल्यामुळे होणारे स्क्रॅचसुद्धा कमी होतात.

कसा आहे प्रोसेसर?

गुगल पिक्सेल 9 मध्ये टेन्सर जी4 प्रोसेसर आहे. जो स्मार्टफोनमध्ये अति-गतीने काम करणारी क्षमता यामध्ये असून त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही ॲपवर कुठल्याही अडथळ्यांशिवाय काम करू शकता.

मोठ्या प्रमाणावर डेटा स्टोर करण्यासाठी आणि मल्टीटास्किंग करण्यासाठी हा स्मार्टफोन उत्तम आहे. त्यात 4700 एमएएच बॅटरी आहे. ज्यात 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यामुळे तुम्ही कमी वेळात बॅटरी चार्ज करू शकता. जे तुम्हाला दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरते.

कसा आहे कॅमेरा?

फोटोग्राफीच्या बाबतीत पिक्सेल 9 एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये 50 एमपी मुख्य कॅमेरा आहे जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) तंत्रज्ञानासह येतो. जे तुमच्या फोटोंना अधिक स्पष्ट आणि स्थिर बनवते. 48 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे, ज्यामुळे तुम्ही विस्तीर्ण शॉट्स किंवा दृष्यांचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकता.

सेल्फी कॅमेराच्या बाबतीत 10.5 एमपी सेल्फी शूटर आहे. जो शानदार सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आदर्श आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेराने उच्च गुणवत्ता, रंगांची सुस्पष्टता आणि विस्तृत दृश्य प्रदान करतात.

तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा पिक्सेल स्मार्टफोनवर स्विच करायचा असाल तर फ्लिपकार्टवरील पिक्सेल 9 ची ही डील एक उत्तम संधी आहे.

त्याच्या तपशीलवार वैशिष्ट्यांसह आणि त्या किमतीत मिळणारी सवलत तुम्हाला एक उत्कृष्ट स्मार्टफोन मिळवण्याची संधी देतो. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफरचा लाभ घेऊन स्मार्टफोनच्या जगात एक उत्तम अनुभव मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe