Maruti Eeco Price Hike:- भारतातील सर्वात परवडणारी सात- सीटर कार म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी इको आता किंचित महाग झाली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२५ पासून या कारच्या सर्व प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. मारुतीने इकोच्या किमतीत १२,००० रुपयांपर्यंत वाढ केली असून त्यामुळे आता या गाडीच्या विविध प्रकारांसाठी किंमत ५.७३ लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
किती वाढवण्यात आल्या किमती?
![maruti eeco](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/eeco.jpg)
ही किंमतवाढ सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू करण्यात आली आहे. मारुती इको पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि दोन्ही प्रकारांमध्ये किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व्हर्जनच्या बेसिक मॉडेलसाठी (एसटीडी ५-सीटर) नवीन किंमत ५.४४ लाख रुपये झाली आहे.
जी आधी ५.३२ लाख रुपये होती. त्याचप्रमाणे, ७-सीटर एसटीडी व्हेरिएंटची किंमत आता ५.७३ लाख रुपये झाली आहे.जी पूर्वी ५.६१ लाख रुपये होती. ही वाढ सुमारे २.२६% पर्यंत आहे. जी वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी काही प्रमाणात आर्थिक भार वाढवणारी ठरू शकते.
सीएनजी प्रकारात झाली इतकी किंमत वाढ
सीएनजी प्रकारांमध्येही किंमत वाढ झाली आहे. कार्गो सीएनजी व्हर्जन (जो व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो) याची नवी किंमत ६.४९ लाख रुपये झाली असून याआधी ती ६.३७ लाख रुपये होती.
याशिवाय, ५-सीटर एसी (ओ) व्हर्जनची किंमत ६.५८ लाख रुपयांवरून ६.७० लाख रुपये झाली आहे. ही किंमतवाढ व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी विशेषतः महत्त्वाची ठरते. कारण इको ही मोठ्या प्रमाणावर कार्गो ट्रान्सपोर्ट आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येते.
या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांवर थोडा आर्थिक भार येऊ शकतो. ईको ही मुख्यतः व्यावसायिक वापरासाठी खरेदी केली जाते. त्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि लहान व्यावसायिक यांना या वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच काही कुटुंबे जी मोठ्या जागेसाठी आणि सात सीटर कारसाठी इकोला पसंती देतात. त्यांनाही ही किंमतवाढ जाणवेल. विशेष म्हणजे कंपनीने या किंमतवाढीसोबत कोणतेही नवीन फीचर्स किंवा अपडेट्स सादर केलेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच गाडी मिळेल, पण किंमत मात्र अधिक मोजावी लागेल.
इको खरेदी करायची तर लवकर निर्णय फायद्याचा
जर तुम्ही मारुती इको खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणे योग्य ठरेल. आगामी महिन्यांत वाहनांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मारुती इको ही भारतातील सर्वात परवडणारी ७-सीटर कार आहे.जी कमी बजेटमध्ये मोठी कार हवी असलेल्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरते. किंमत वाढली असली तरीही इको अजूनही किफायतशीर आणि व्यावसायिक तसेच कौटुंबिक वापरासाठी एक उत्तम पर्याय म्हणून बाजारात टिकून आहे.