घर खरेदी करण्याची प्लॅनिंग आहे? Home Loan घेण्यापूर्वी ‘या’ पाच चुका टाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान

गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे घरांच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र गृहकर्ज उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.home loan

Ratnakar Ashok Patil
Published:

Home Loan Tips:-  गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे घरांच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र गृहकर्ज उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.

गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी असल्याने मागणीही वाढली आहे. बहुतांश लोक बँकांकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात. परंतु त्याची परतफेड दीर्घ कालावधीपर्यंत करावी लागते.

साधारणतः बँका ३० वर्षांपर्यंत गृहकर्ज देतात.परंतु आता काही वित्तसंस्थांकडून ४० वर्षांपर्यंतचा कर्ज कालावधी देखील दिला जातो. कर्जाचा कालावधी मोठा असल्याने EMI (मासिक हप्ता) तुलनेने कमी असतो.त्यामुळे बजेटमध्ये बसतो. मात्र या सोईसोबत काही जोखीमही असतात.

दीर्घकालीन गृहकर्जाचे फायदे आणि जोखीम

दीर्घकालीन गृहकर्ज घेतल्याने EMI कमी होतो.ज्यामुळे दरमहा आर्थिक ताण जाणवत नाही. मोठ्या रकमेचे कर्ज असल्याने एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरणे कठीण असते.त्यामुळे हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सुविधा मिळते. कर्जाचा कालावधी जास्त असल्याने अचानक मोठा आर्थिक भार येत नाही. परंतु याचा दुसरी बाजू अशी आहे की, कर्जाची परतफेड खूपच लांब कालावधीपर्यंत करावी लागते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३०-३५व्या वर्षी ४० वर्षांसाठी गृहकर्ज घेतले तर त्याला ७०-७५ वर्षांपर्यंत EMI भरावा लागू शकतो. निवृत्तीनंतर उत्पन्नाचे निश्चित साधन नसेल तर EMI भरणे कठीण होऊ शकते. अशा वेळी अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो, जो भविष्यातील आर्थिक नियोजन बिघडवू शकतो.

गृहकर्जाचा EMI कमी करण्यासाठी योग्य पद्धती

कर्जाचा कालावधी वाढविल्यास EMI कमी होतो. त्यामुळे परतफेड करणे तुलनेने सोपे होते. कर्ज घेण्यापूर्वी व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आधारावर किती EMI परवडू शकतो हे पाहणे महत्त्वाचे असते.

अनेकदा मोठ्या गृहकर्जासाठी २०-२५ वर्षांचा कालावधी पुरेसा ठरतो.परंतु कालावधी वाढविल्यास मासिक EMI जरी कमी झाला तरी संपूर्ण कर्जाच्या रकमेवर भरावे लागणारे व्याज प्रचंड वाढते. त्यामुळे दीर्घकालीन गृहकर्ज फायद्याचे वाटले तरी प्रत्यक्षात ते अधिक खर्चिक ठरू शकते.

गृहकर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

गृहकर्ज घेताना आपल्या आर्थिक स्थैर्याचा अंदाज घेऊन EMI चा भार झेपेल का? याचा विचार करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गृहकर्ज स्वस्त वाटत असले तरी त्यावर येणारा व्याजदर आणि एकूण परतफेडीची रक्कम दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकते. त्यामुळे गृहकर्जाचा कालावधी ठरवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

कर्ज घेताना जास्तीत जास्त डाउन पेमेंट भरल्यास EMI चा बोजा कमी करता येतो. शिवाय व्याजदर कमी असलेल्या कर्ज पर्यायांचा शोध घेणे देखील फायद्याचे ठरते. गृहकर्ज हा मोठा आर्थिक निर्णय असल्यामुळे विचारपूर्वक नियोजन करूनच पुढे जाणे श्रेयस्कर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe