Mahindra BE 6 Downpayment : भारतात गेल्या काही वर्षामध्ये सेडान ऐवजी SUV कारला डिमांड आली आहे. विशेषता तरुणांमध्ये एसयुव्ही गाड्यांची मोठी क्रेज पाहायला मिळते. अलीकडे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीची मागणी सुद्धा वाढली आहे. हे लक्षात घेता, वाहन उत्पादकांकडून बर्याच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणल्या जात आहेत.
सध्या स्थितीला भारतीय कार मार्केटच्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता या सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला पाहायला मिळतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात आणि विक्रीमध्ये टाटा कंपनी सध्या टॉपवर आहे. मात्र लवकरच टाटा कंपनीची ही मक्तेदारी मोडीत काढली जाणार आहे.
![Mahindra BE 6 Downpayment](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mahindra-BE-6-Downpayment.jpeg)
कारण की आता इतरही अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ मजबूत बनवण्यास सुरुवात केली आहे. महिंद्रा सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. महिंद्रा ने अलीकडेच Xev 9 अन BE 6 या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च केल्यात.
दरम्यान या गाडीची अधिकृत बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या BE 6 गाडीचे बेस वेरिएंट पॅक वन खरेदी करायची असेल आणि यासाठी तीन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागू शकतो याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कारची किंमत काय आहे?
पॅक वनला महिंद्राने बी 6 चा सर्वात स्वस्त प्रकार म्हणून ऑफर केले आहे. या एसयूव्हीचा पॅक वन हा प्रकार 18.90 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीवर दिला जाणार आहे.
ही गाडीची एक्स शोरूम किंमत असून ऑन रोड प्राईस बाबत बोलायचं झालं तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत या गाडीची किंमत 19 लाख 87 हजार 379 रुपये इतकी राहणार आहे.
3 लाख डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता?
महिंद्रा BE 6 पॅक वन खरेदी करायची असेल आणि यासाठी जर तीन लाख रुपये डाऊन पेमेंट केले गेले तर 16 लाख 87 हजार 379 रुपये फायनान्स करावे लागणार आहे.
जर समजा बँकेकडून ही फायनान्स रक्कम नऊ टक्के व्याजदरात उपलब्ध करून देण्यात आली अन कर्ज परतफेडीचा कालावधी सात वर्ष इतका देण्यात आला तर 27148 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.
किती व्याज लागणार?
जर आपण नऊ टक्के दरासह सात वर्षांसाठी 16,87,379 रुपये बँकेकडून कार लोन घेतले तर आपल्याला सात वर्षांसाठी दरमहा 27,148 रुपये ईएमआय द्यावा लागेल.
अशा परिस्थितीत, सात वर्षांत, आपण महिंद्राच्या BE6 पॅक वनसाठी सुमारे 5.93 लाख रुपये अतिरिक्त द्याल. म्हणजेच पाच लाख 93 हजार रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागतील. अशा तऱ्हेने ही गाडी ग्राहकांना 25.80 लाख रुपयांना पडेल.