Home Loan : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला आयकरात दिलासा दिल्यानंतर, आता मध्यमवर्गाला स्वस्त कर्जाची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या तीन दिवसांपासून आरबीआयची आर्थिक धोरण समितीची बैठक सुरू होती. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात केली जाईल अशी आशा साऱ्यांनाच होती. तज्ञांच्या माध्यमातून यावेळी रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल असे म्हटले जात होते.
झालं देखील तसंच आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय झालाय. आर्थिक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना आरबीआयचे राज्यपाल संजय मल्होत्रा यांनी असे सांगितले की, सहा सदस्य समितीने रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासह, एमपीसीने आपली भूमिका ‘तटस्थ’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीने सुमारे पाच वर्षानंतर रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला आहे. मागील दोन वर्षांपासून रेपो दर 6.50 टक्के इतका स्थिर होता. मात्र आता यात 0.25% कपात करण्यात आली आहे. यामुळे होम लोन स्वस्त होणार आहे.
दरम्यान आता आपण या निर्णयामुळे गृह कर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार, एका लाखा मागे किती रुपयांचे व्याज वाचणार? याचा आढावा घेणार आहोत. बँक बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी म्हणतात की जर एखाद्याने 20 वर्षांसाठी 8.75% दराने गृह कर्ज घेतले असेल आणि मार्चपर्यंत 12 ईएमआय भरलेले असतील तर एप्रिलपासून 0.25% कपातीसह अशा व्यक्तीला व्याजावर प्रति लाख 8417 ची बचत करता येणार आहे.
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास 50 लाखांच्या कर्जावर, आपण या दराने 4.20 लाख रुपये वाचवू शकता. ज्यामध्ये कर्ज कालावधीपासून 10 ईएमआय कमी होतील, अन इतर सर्व पॅरामीटर्स स्थिर राहतील. दरम्यान, बँक बाझरने आता अशी शिफारस केली आहे की चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांनी 50 बीपीएस किंवा त्यापेक्षा कमी रिफायनन्स सारख्या पर्यायांवर कार्य केले पाहिजे.
जर ते कमी व्याजदरासह ईएमआय स्थिर ठेवत असतील, जर दर 8.25% असे गृहीत धरल्यास प्रति लाख सुमारे 14,480 रुपयांची बचत होईल. म्हणजे प्रति लाख 15% बचत होईल अन ही बचत बरीच मोठी आहे.
कर्जाच्या 12 ईएमआयची परतफेड केल्यानंतर 1 एप्रिलपासून व्याज दर लागू होईल असे गृहित धरल्यास आपण उर्वरित वर्षात प्रति लाख ₹ 3002 चे व्याज वाचवू शकतो. याचा अर्थ असा आहे की 50 लाखांच्या कर्जावर कर्जाच्या दुसर्या वर्षात ₹ 1.50 लाख रुपयांची बचत होईल. यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.