SBI Home Loan : रिझर्व बँक ऑफ इंडियाने आज शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी तब्बल पाच वर्षांनी रेपो रेटमध्ये कपात करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आरबीआय कडून रेपो रेटमध्ये तब्बल 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली असून याचा परिणाम म्हणून आता सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहे.
गृहकर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आता कमी होईल आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी EMI भरावा लागणार आहे. दरम्यान, आज आपण आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एसबीआय कडून जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी 50 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

गृह कर्ज स्वस्त होणार
आरबीआय ने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के इतका कमी केला आहे. म्हणजेच रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली असून यामुळे आता सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे.
एसबीआय सध्या 8.50% दराने आपल्या ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र नवीन दर लागू झाल्यानंतर एसबीआयचे गृहकजावरील व्याजदर 8.25 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण एसबीआयच्या या नव्या दरानुसार एखाद्या ग्राहकाला 30 वर्षांसाठी 50 लाखाचे कर्ज मंजूर झाले तर ग्राहकांचे किती रुपये वाचतील याबाबत माहिती पाहूयात अन नव्या दरानुसार तीस वर्षांसाठी 50 लाखाचे कर्ज मंजूर झाले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याचीही माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
50 लाखाचे कर्ज मंजूर झाल्यास किती रुपये वाचतील
जर समजा सध्याच्या दरानुसार म्हणजेच 8.50% दरानुसार एखाद्या ग्राहकाला 30 वर्षांसाठी एसबीआय कडून 50 लाख रुपये मंजूर झाले तर ग्राहकांना 38,446 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या काळात ग्राहकांना या कर्जासाठी 88 लाख 40 हजार 483 रुपये व्याज स्वरूपात द्यावे लागणार आहेत. पण जर एसबीआय ने गृह कर्जावरील व्याजदर 8.25 टक्के इतके कमी केले तर यानुसार 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास 37 हजार 563 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
या काळात 85 लाख 22 हजार 799 व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. यानुसार संपूर्ण कर्जावर तीन लाख 17 हजार 644 रुपयांची बचत होणार आहे. प्रत्येक ईएमआयवर ग्राहकांचे 883 रुपये वाचणार आहेत.