मूर्ती विटंबनेची फिर्याद दिल्याने सेवेकऱ्याचा खून

Sushant Kulkarni
Published:

८ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे प्रजासत्ताकदिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची निघृण हत्या करण्यात आली होती.या घटनेमुळे शेवगावसह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.अखेर सेवेकऱ्याच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे.पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याची फिर्याद हत्या झालेले सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांनी दिली होती.

याचा राग मनात धरुन सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची आरोपी कैलास सुंदर काशिद याने निघृण हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.सेवेकऱ्याच्या खुनाचे रहस्य शेवगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडले.आरोपी कैलास काशिद याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.२६ जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती.

त्यांचे मुंडके एका तर धड दुसऱ्या विहिरीत आढळून आले होते.आरोपीने अतिशय निघृणपणे नामदेव दहातोंडे यांची हत्या केली होती.या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी एकनाथ भानुदास घोरतळे (रा. बोधेगाव) यांनी फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या घटनेची गांभिर्याने दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तत्काळ तपास लावून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते.शेवगाव पोलिसांनी दहातोंडे यांच्या हत्येचे रहस्य मोठ्या शिताफीने उलगडले.दहातोंडे यांनी आरोपी कैलास काशिद याच्या विरुद्ध पहिलवान बाबा मूर्तीची विटबंना प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

त्याचा राग मनात धरुन कैलास सुंदर काशिद या आरोपीने सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची हत्याची केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, दहातोंडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बोधेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.दहातोंडे यांच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी बोधेगावातील ग्रामस्थांनी केली होती.

दहातोंडे सेवेकऱ्याच्या खुनाचा तपास एसआयटीमार्फत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही दिला होता. एकंदरितच सेवेकरी नामदेव दहातोंडे यांच्या निघृण हत्येमुळे बोधेगावकरांमध्ये संतापाची लाट होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe